---Advertisement---

धोनी- कोहलीबद्दल घडला क्रिकेटजगतातील बाप योगयोग

On: बुधवार, जानेवारी 23, 2019 4:32 PM
---Advertisement---

नेपीयर। आज(23 जानेवारी) भारताने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 8 विकेट्स विजय मिळवला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या विजयामुळे विराट कोहली आणि एमएस धोनी या भारताच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये एक खास योगायोग झाला आहे. न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचे वनडेत नेतृत्व करताना विजय मिळवणारा विराट हा धोनीनंतरचा दुसराच कर्णधार ठरला आहे.

2009 च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-1 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 53 धावांनी जिंकला होता.

या मालिकेनंतर भारताने जवळ जवळ 10 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

आजच्या सामन्यात भारतासमोर प्रखर सुर्यप्रकाशामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार 49 षटकात 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवनने नाबाद 75 धावांची खेळी केली तर विराटने 45, रोहित शर्माने 11 आणि अंबाती रायडूने नाबाद 13 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना 38 षटकात सर्वबाद 157 धावा करता आल्या होत्या.

या सामन्यात भारताकडून कुलदीप यादवने 39 धावांत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 19 धावांत 3, युजवेंद्र चहलने 43 धावांत 2 आणि केदार जाधवने 17 धावांत 1 विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

बापरे! असेही एक कारण ज्यामुळे टीम इंडियाचा हा विजय आहे खास

त्या ५ धावा विराट कोहलीला पडल्या भलत्याच महागात!

धोनीचा तो सल्ला कुलदीप यादवसाठी ठरला सर्वात मौल्यवान, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment