भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यानं 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. आता या लग्नातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत दिसत आहे.
अनंत अंबानींच्या लग्नात धोनीनं सोनेरी रंगाचा ड्रेस घातला होता, जो पठाणी कुर्ता आणि सलवारसारखा दिसतो. दुसरीकडे, पत्नी साक्षी हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. या दोघांची मुलगी झिवा धोनी हिनं पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि क्यूट दिसत होती. याआधी काल झालेल्या पूजा समारंभात देखील महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दिसले होते. तुम्ही धोनी आणि कुटुंबियांचा लग्न समासमारंभातील व्हिडिओ येथे पाहू शकता.
#WATCH | Cricketer Mahendra Singh Dhoni along with his wife Sakshi and daughter Ziva arrive for Anant Ambani-Radhika Merchant wedding at Jio World Convention Centre in Mumbai pic.twitter.com/cge6jyNwdO
— ANI (@ANI) July 12, 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. 12 जुलै रोजी दोघांनीही लग्नाचे सात फेरे घेतले. या आधी लग्न मिरवणूक दुपारी 3 वाजता निघेल असं सांगण्यात आलं होतं, मात्र नंतर वेळ वाढवून 5 वाजेपर्यंत करण्यात आली.
या लग्नसोहळ्याला केवळ क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच नाही तर देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. अनिल कपूर, रजनीकांत यांच्यासह बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकारही पोहोचले होते. याआधी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यालाही अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सनी हजेरी लावली होती. त्या सोहळ्यातही धोनी कुटुंबासह सहभागी झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
गौतम गंभीरची नियुक्ती आहे दुधारी तलवार! सर्वात मोठी ताकद बनू शकते सर्वात मोठी कमजोरी
“तुझी 22 वर्षांची कारकीर्द…”, जेम्स अँडरसनसाठी सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
असा गोलंदाज पुन्हा होणे नाही! जेम्स अँडरसनचे क्रिकेटमधील असे रेकॉर्ड, जे कोणालाही मोडता येणे अशक्य