भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, आजही कोट्यवधी चाहते त्याची आठवण काढत असतात. त्याचे अनेक जुने व्हिडिओ शेअर करत असतात. धोनी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. याव्यतिरिक्त तो सर्वात फिटही होता. त्याची फिटनेस पाहून आजही चाहते थक्क झाल्याशिवाय राहत नाहीत. अशात धोनीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्यासोबत दिसत आहे.
एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांची शर्यत
खरं तर, व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारत आणि श्रीलंका संघात सप्टेंबर 2017मध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्याचा आहे. या मालिकेदरम्यान एमएस धोनी (MS Dhoni) याचे वय 36 वर्षे होते आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचे वय 24 वर्षे होते. सामन्यापूर्वीच्या सराव सत्रादरम्यान अचानक दोघांनी शर्यत लावण्याचे ठरवले आणि 100 मीटर शर्यत लावली.
https://www.instagram.com/reel/Ck7i2U6AJHM/?utm_source=ig_embed&ig_rid=52e395fe-e968-43fd-87f8-fbb6011a1df9
या शर्यतीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पंड्या धोनीच्या मागेच राहिला. शेवटी आपल्यापेक्षा 12 वर्षे मोठ्या असलेल्या धोनीकडून तो वाईटरीत्या पराभूत झाला. अशाप्रकारे धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले की, वय कितीही असले, तरीही फिटनेसच्या बाबतीत तो कोणत्याही युवा खेळाडूपेक्षा कमी नाही.
रोहित शर्माने ठोकलेले द्विशतक, भारताने श्रीलंकेवर मिळवलेला 141 धावांनी विजय
एमएस धोनी आणि हार्दिक पंड्या यांची शर्यत (MS Dhoni And Hardik Pandya Race) या सामन्यात चर्चेचा विषय ठरली होतीच. मात्र, याव्यतिरिक्त असेही काही घडले होते, ज्याने इतिहास रचला गेला होता. खरं तर, या सामन्यात भारतीय संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने त्याचे पहिले द्विशतक झळकावले होते. त्याने अवघ्या 153 चेंडूत 208 धावा कुटल्या होत्या. तसेच, श्रीलंका संघाच्या गोलंदाजी फळीला घाम फोडला होता. रोहितच्या द्विशतकामुळे भारताने 392 धावांचे आव्हान उभे केले होते, त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाला 251 धावाच करता आल्या होत्या. यामुळे भारताने हा सामना 141 धावांनी जिंकला होता. (MS Dhoni beats Hardik pandya in 100 meter race see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या माजी दिग्गजाने पुन्हा साधला भारतावर निशाणा, धवन- लक्ष्मणच्या निर्णयावर म्हणाला…
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा