इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२१) ४७ वा सामना गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व सातव्या क्रमांकावरील राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान खेळला गेला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच एका अविश्वसनीय विक्रमाला गवसणी घातली.
धोनीचा अविश्वसनीय कारनामा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला व तीन वेळा चेन्नई आयपीएल विजेतेपद मिळवून देणारा एमएस हा या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करत होता. नाणेफेकीसाठी मैदानात येताच त्याच्या नावे कर्णधार म्हणून आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम जमा झाला.
कर्णधार म्हणून धोनीचा हा आयपीएलमधील २०० वा सामना ठरला. यापैकी १३ सामन्यांमध्ये त्याने २०१६ साली रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचे नेतृत्व केले होते. तर, उर्वरित १८७ सामन्यात तो चेन्नईचा कर्णधार राहिला आहे. या विक्रमाच्या यादीत त्याच्या आसपासही कोणता खेळाडू नाही. दुसऱ्या क्रमांकावरील विराट कोहली चालू हंगामानंतर आयपीएलमध्ये नेतृत्व करणार नाही.
कर्णधार म्हणून दिमाखदार कामगिरी
धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवले असून, १२ पैकी केवळ एकदाच ते प्ले ऑफसाठी पात्र ठरले नव्हते. खेळाडू म्हणून १३ वेळा आयपीएल प्ले ऑफ खेळणारा व ९ वेळा अंतिम सामना खेळणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.
चेन्नई ठरली आहे प्ले ऑफसाठी पात्र
आयपीएल २०२१ मध्येही प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा चेन्नई पहिला संघ ठरला. मागील वर्षी चेन्नईला प्ले ऑफसाठी पात्र होता आले नव्हते. यावर्षी फाफ डू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तर, ड्वेन ब्रावो, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजा, दीपक चहर व शार्दुल ठाकूर हे गोलंदाजही विजयात योगदान देताना दिसत आहेत.
कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
एमएस धोनी २००
विराट कोहली १३६
गौतम गंभीर १२९
रोहित शर्मा १२४
ऍडम गिलख्रिस्ट ७४
महत्त्वाच्या बातम्या –
मैदानातून थेट दवाखान्यात! चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात ‘हा’ स्टार पाकिस्तानी क्रिकेटर जखमी
विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात यावी भारताच्या कर्णधारपदाची धूरा, डेल स्टेनचे मत
आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी सोडला सुटकेचा निश्वास; ‘या’ प्रमुख नियमात मिळाली सूट