बंगळूरु। बुधवारी(27 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलिेयाने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 अशा फरकाने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने ही मालिकाही खिशात घातली.
या सामन्यात भारतीय संघ जरी पराभूत झाला असला तरी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीसाठी हा सामना खास ठरला आहे. त्याने या सामन्यात 23 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 40 धावा केल्या.
याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 षटकार मारण्याचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 515 डाव खेळताना 352 षटकार मारले आहेत.
या सामन्यात धोनीने कर्णधार विराट कोहलीबरोबर चौथ्या विकेटसाठी 100 धावांची शतकी भागीदारीही केली आहे. कोहलीने सामन्यात 72 धावांची नाबाद खेळी केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू-
352 – एमएस धोनी(525 सामने)
349 – रोहित शर्मा (322 सामने)
264 – सचिन तेंडुलकर (664 सामने)
251 – युवराज सिंग (402 सामने)
247 – सौरव गांगुली(424 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार कोहलीच्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी नकोशी गोष्ट
–किंग कोहलीने केली रोहित शर्माच्या या विश्वविक्रमाची बरोबरी
–१ मार्च ठरणार टीम इंडियाच्या सदस्यांसह चाहत्यांसाठी सर्वात खास दिवस






