दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील प्लेऑफच्या फेरीला रविवारपासून (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेतील अव्वल दोन संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. हा सामना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
या सामन्यात धोनीनं नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. धोनीचा हा खेळाडू म्हणून आयपीएल प्लेऑफमधील २५ वा सामना होता. आयपीएल प्लेऑफमध्ये २५ सामने खेळणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या पाठोपाठ सुरेश रैना आहे. रैनाने २४ सामने आयपीएल प्लऑफमध्ये खेळले आहेत. रैना या सामन्यासाठी चेन्नईच्या अंतिम ११ जणांच्या संघाचा भाग नव्हता.
धोनीला सर्वाधिक प्लेऑफमध्ये खेळण्याचा अनुभव
आयपीएलचे आत्तापर्यंत १४ हंगाम झाले आहेत. त्यातील १२ हंगामात धोनी प्लेऑफमध्ये खेळला आहे. विशेष म्हणजे ११ वेळा तो चेन्नईकडून आयपीएल प्लेऑफमध्ये खेळला असून या ११ हंगामात त्याने चेन्नईचे नेतृत्वही केले आहे. तर, २०१७ साली हो स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळला आहे.
धोनीने सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू
आयपीएलमध्ये सर्वाधिक अनुभवी खेळाडूचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये २१९ सामने खेळले असून ४७०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अंतिम १५ जणांचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची धूरा
प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू