कोलंबो । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघाने ३ बाद ६३ वरून चांगली कामगिरी करत ४२ षटकांत २०१ अशी चांगली कामगिरी केली. परंतु त्याचे पुढे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात ते अपयशी ठरले आणि लंकेचा डाव ४९.४ षटकांत सर्वबाद २३८ धावांवर संपुष्टात आला.
याबरोबर या सामन्यात काही विक्रमही झाले. त्याच विक्रमांचा हा लेखाजोखा
१- दोन देशांत खेळवलेली ही ५ सामन्यांची पहिली मालिका आहे ज्यात दोन वेगवान भारतीय गोलंदाजांनी ५ बळी घेतले आहेत.
२- एमएस धोनी हा वनडे क्रिकेटमध्ये १०० यष्टिचित करणारा पहिला खेळाडू बनला.
३- दोन देशांत खेळवलेलया ५ सामन्यांच्या मालिकेत १५ विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह हा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.
४- भारतीय वनडे क्रिकेटच्या ९२२ सामन्यांच्या इतिहासात प्रथमच दोन रिस्ट स्पिनर एकाच सामन्यात खेळले. युझवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव हे ते गोलंदाज.
५- निरोशन डिकवेल्लाने ५ सामन्यात चार वेगवेगळ्या सलामीवीरांबरोबर फलंदाजी केली आहे. दानुष्का गुणातिलका(पहिले २ सामने ), दिनेश चंडिमल( ३रा सामना ), दिलशान मुनावीरा (चौथा सामना) आणि उपुल थरांगा (पाचवा सामना ) हे ते सलामीवीर.