लंडन। शनिवार, 14 जुलैला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वनडे सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला. त्याने वनडेत यष्टीमागे ३००वा झेल घेण्याचा पराक्रम केला.
अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा यष्टीरक्षक ठरला आहे. यापुर्वी अॅडम गिलख्रिस्ट (४१७), मार्क बाऊचर (४०२) आणि कुमार संगकाराने (३८३) असा पराक्रम केला आहे.
३२० सामन्यात धोनीने ३०० झेल आणि १०७ यष्टीचीत केले आहेत. विशेष म्हणजे यातील धोनी आणि अॅडम गिलख्रिस्ट यांनी कधीही क्षेत्ररक्षक म्हणुन झेल घेतलेला नाही. कुमार संगकाराने १९ तर मार्क बाऊचरने १ झेल क्षेत्ररक्षक म्हणुन घेतला आहे.
वनडेत सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू-
धोनी हा वनडेत एकप्रकारे सर्वाधिक झेल घेणाराही चौथा खेळाडू ठरला आहे. यष्टीरक्षक पकडून वनडेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये अॅडम गिलख्रिस्ट (४१७), मार्क बाऊचर (४०३) आणि कुमार संगकाराने (४००) आणि एमएस धोनीचा (३००) चा समावेश होतो.
महत्त्वाच्या बातम्या:
-म्हणुन धोनी आहेत जगातील सर्वात हुशार क्रिकेटर…
-असाही एक विक्रम जो भारत इंग्लंड दुसऱ्या वनडेत टाॅसवेळी झाला
-काय सांगता! दक्षिण आफ्रिका ७३ धावांवर आॅल आऊट!