आयपीएलमध्ये झालेल्या 25 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 37 धावांनी पराभव केला. सीएसकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. सीएसकेला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम नोंदविला आहे. धोनी टी20 क्रिकेटमध्ये 300 षटकार ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
धोनीपूर्वी रोहित शर्मा आणि सुरेश रैनाने टी20 क्रिकेटमध्ये 300 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकले आहेत. रोहितने टी20 मध्ये आतापर्यंत 375 षटकार लगावले आहेत तर रैनाने 311 षटकार लगावले आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनीने 6 चेंडूत 10 धावा केल्या. धोनीने आपल्या खेळीदरम्यान एक षटकार ठोकला परंतु पुढे तो मोठा डाव खेळू शकला नाही.
Indian players with 300-plus sixes in T20 cricket:
Rohit Sharma
Suresh Raina
MS DHONI*#CSKvRCB— Umang Pabari (@UPStatsman) October 10, 2020
षटकारांच्या विक्रमाशिवाय धोनीने यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेतले आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने आयपीएलमध्ये 106 झेल घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ दिनेश कार्तिक असून त्याने 104 झेल घेतले आहेत.
MS Dhoni now holds the record of taking most catches among keepers in IPL, going past Dinesh Karthik’s tally of 104 catches.#CSKvRCB
— Umang Pabari (@UPStatsman) October 10, 2020
शनिवारी झालेल्या पराभवानंतर चेन्नई गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर आरसीबीला विजयाचा फायदा झाला आणि संघ चौथ्या क्रमांकावर पोहोचला.
या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 90 धावा केल्या होत्या त्यामुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. कोहलीच्या संघर्षमय खेळीमुळे बंगलोरला अवघड खेळपट्टीवर 169 धावा करता आल्या. सीएसके 20 षटकांत 8 बाद 132 धावाच करू शकला. सीएसकेकडून रायडूने सर्वाधिक 42 धावा केल्या.