भारतीय क्रिकेट पुरूष संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने रविवारी (25 सप्टेंबर) एक घोषणा केली आहे. त्यापूर्वी बहुतेक जणांनी तो क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर करेल असे निष्कर्ष लावले जात होते, मात्र असे काही झाले नाही. यामुळे या दिग्गज क्रिकेटपटूच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MSDhoni) याने ओरिओ बिस्किट लाँच केले. त्याने ओरिओसोबत लाईव्ह येत याची घोषणा केली आहे. त्याने शनिवारी (24 सप्टेंबर) सोशल मीडियावर पोस्ट करत तो लाईव्ह येणार हे सांगितले होते. यानंतर या 41 वर्षीय क्रिकेटपटूच्या या पोस्टचा अनेकांनी वेगवेगळा अंदाज लावला. धोनीने ऑगस्ट 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणे सुरू ठेवले आहे.
Dhoni from OREO live …
Super stylish 🔥🔥.. @MSDhoni #Oreo pic.twitter.com/fziN38cXkE
— 𝑪𝑺𝑲 𝑳𝒐𝒚𝒂𝒍 𝑭𝑪 (@CSK_Zealots) September 25, 2022
धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. तसेच त्याने 2013च्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे कर्णधारपद भुषविले होते.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक द्विशतक, 6 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने 350 वनडे सामन्यात 10 शतक आणि 73 अर्धशतकांच्या साहाय्याने 10773 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या 98 सामन्यात 1617 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएल 2023चा हंगाम जुन्या पद्धतीने खेळला जाणार आहे. याचा अर्थ संघ आता घरच्या आणि विरोधी संघांच्या मैदानावर खेळणार आहेत. यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नईमध्ये खेळताना दिसणार आहेत. यासाठी कधी एकदाचा आयपीएल 2023 सुरू होतो याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11