---Advertisement---

धोनीने मौन सोडले; निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य

On: शनिवार, जुलै 6, 2019 3:34 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. पण धोनीने त्याच्या निवृत्तीबद्दल बोलताना तो कधी निवृत्ती घेणार हे त्यालाच माहित नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने त्याच्यावर टीका करणाऱ्या लोकांवरही उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी शुक्रवारी(5 जूलै) धोनी म्हणाला, ‘मला माहित नाही मी केव्हा निवृत्त होणार आहे. पण अनेक लोकांची इच्छा आहे की मी उद्याच्या सामन्याआधी(श्रीलंका विरुद्धच्या) निवृत्त व्हावे.’

धोनीवर मागील काही सामन्यांपासून त्याच्या फलंदाजीतील कामगिरीमुळे प्रचंड टीका होत आहे.  पण त्याला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने पाठिंबा दिला आहे.

धोनीने या विश्वचषकात 7 डावात 93 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत.यामध्ये त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे.

मागील काही दिवसांत आलेल्या वृत्तानुसार या विश्वचषकातील भारताचा शेवटचा सामना हा धोनीचाही कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकारीने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले होते की ‘तूम्ही एमएस धोनीबद्दल काही सांगू शकत नाही. पण तो या विश्वचषकानंतर पुढे भारताकडून खेळत राहिल याची शक्यता कमी आहे. त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जसा अचानक घेतला होता, त्यावरुन त्याच्याबद्दल सध्या काही अंदाज बांधणे कठीण आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने केले दोन बदल, या खेळाडूंना मिळाली संधी

आज शेवटचा वनडे खेळणाऱ्या इम्रान ताहिरने दिला भावनिक संदेश

उपांत्य फेरीत प्रवेश करताच न्यूझीलंडने केली या विश्वविक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment