Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हॅप्पी बड्डे साक्षी! रांचीतील फार्महाऊसवर ‘असा’ साजरा झाला साक्षीचा वाढदिवस, धोनीने केले सेलिब्रेशन

November 19, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
Screengrab: Instagram/@maahi.7.7.81

Screengrab: Instagram/@maahi.7.7.81


भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये गणला जाणाऱ्या एमएस धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिचा आज (१९ नोव्हेंबर) ३३ वा वाढदिवस आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये धोनी भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी कार्यरत होता. मात्र टी२० विश्वचषक संपल्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत रांचीमध्ये वेळ घालवत आहे. रांची येथील आपल्या फार्म हाऊसवरच त्याने पत्नी साक्षीचा वाढदिवसही साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाचा व्हिडिओ चाहत्यांच्या पंसतीस उतरताना दिसतो आहे.

साक्षीचा मित्र प्रियांशू चोप्रा याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये साक्षीचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत साक्षी वाढदिवसाचा केक कापताना दिसते आहे. तिच्या बाजूला धोनी काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान करुन उभा असल्याले दिसते आहे. तर साक्षीनेही केकच्या रंगाशी मिळताजुळता पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

तिच्या वाढदिवसावेळी धोनी कुटुंबियांसोबत इतर मंडळीही तिथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. साक्षीचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Seemant Lohani (@seemantlohani)

View this post on Instagram

A post shared by RANCHI BIGGEST FAN CLUB (160K) (@maahi7.7.81)

साक्षी आणि धोनीच्या जोडप्याची आयपीएल २०२१ वेळी खूप चर्चा झाली होती. आयपीएलदरम्यान एका सामन्यानंतर साक्षी आणि मुलगी झिवाचा धोनीला मैदानावर जाऊन मिठी मारतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी साक्षीचे बेबी बम्प स्पष्टपणे दिसत होते. यावरुन अनेकांनी साक्षी आणि धोनी दुसऱ्या बाळाचे आई-वडील बनणार असल्याचे अंदाज वर्तवले होते.

जुलै २०१० मध्ये साक्षी आणि धोनी लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना झिवारुपी पहिले बाळ झाले होते. यानंतर आता २०२२ मध्ये त्यांना दुसरे मुल होणार असल्याची शक्यता आहे.

दुसरीकडे धोनीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला टी२० विश्वचषकात विशेष कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने सुपर १२ फेरीतील सुरुवातीची २ सामने गमावले. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग खडतर बनला आणि स्पर्धेअखेर त्यांना टॉप-४ संघांमध्येही जागा मिळवता आली नाही. मात्र आयपीएल २०२१ मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने अप्रतिम प्रदर्शन केले. संपूर्ण हंगामात उल्लेखनीय खेळ दाखवत त्यांनी चषकावरही आपले नाव कोरले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘एबी’ची सर्वप्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती, विराट म्हणाला ‘आय लव्ह यू’; पण तुटलेल्या हृदयासह

भज्जीचा नवा लूक! यष्टीरक्षण करताना अप्रतिम झेल घेताच हरभजनने केला भांगडा, व्हिडिओ व्हायरल

भारताला पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला येण्यासाठी नकार देणे का असेल कठीण? वाचा काय म्हणाले पीसीबी अध्यक्ष


Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

ऐकलंत का! आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने 'या' लीगमध्ये खरेदी केलेत संघ?

Photo Courtesy: Twitter/Blackcaps

दुसऱ्या टी२० सामन्यात निसर्ग देणार का साथ? असा आहे हवामानाचा अंदाज

Photo Courtesy: Twitter/BCCI

दुसऱ्या टी२० सामन्याची उत्सुकता शिगेला; चाहत्यांची रांचीत तुफान गर्दी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143