---Advertisement---

द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी

DHONI IPL 2022
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार, भारतीय संघाचा माजी कर्णधार या सर्व बिरुदालींना मागे टाकून ‘धोनी‘ या एकाच नावाला ब्रँड बनवलेल्या महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) म्हणजेच चाहत्यांचा लाडका ‘थाला‘. धोनीने इंडियन प्रिमियर लीग २०२२ (आयपीएल) मध्ये सातव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळताना अखेरच्या काही षटकांत मोजक्याच चेंडूवर धुवांधार फलंदाजी केली.

धोनीने सदर सामन्यात अवघ्या ६ चेंडूत १६ धावा कुटल्या. यात पहिल्याच चेंडूवर लगावलेला खणखणीत षटकार आणि २ जबरदस्त चौकार यांचा समावेश आहे. मात्र, या १६ धावांसह महेंद्रसिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक मोठा पल्ला गाठला आहे.

धोनीच्या १६ धावा आणि टी-२० क्रिकेट इतिहासात धोनीचे नाव विशेष यादीत समाविष्ट

एम एस धोनीने लखनौ (LSG) संघाविरुद्ध खेळताना केलेल्या १६ धावा खास ठरल्या कारण या धावांसह धोनीने टी-२० (T20I) क्रिकेटमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा अतिशय खास आणि महत्वाचा टप्पा आहे. कारण, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर स्पर्धात्मक लीगमध्ये खेळत धोनीने हा टप्पा गाठला आहे. (MS Dhoni Completed 7000 Runs In T20 Format IPL022 CSK vs LSG)

धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये केलेल्या सर्व धावांचे विवरण…

धोनीने आयपीएलमध्ये खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ७ हजार धावा पूर्ण केल्या. मात्र, त्याच्या या धावा वेगवेगळ्या संघांकडून किंवा स्तरावर पूर्ण झालेल्या आहेत. (MS Dhoni 7000 Runs In T20 Cricket)

४६८७* – चेन्नई सुपर किंग्ज
१६१७ – भारत (वरिष्ट संघ)
५७४ – रायझिंग पुणे सुपरजायंट्स
१२३ – झारखंड

अशा एकूण चार संघाकडून खेळताना धोनीने त्याच्या कारकिर्दीत टी-२०मधील ७ हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे.

एमएस धोनी ठरला सहावा भारतीय….

टी-२० क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा पल्ला ओलांडणारा महेंद्रसिंग धोनी हा काही पहिला भारतीय खेळाडू नाही. त्याच्याही अगोदर ५ भारतीय खेळाडूंनी ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. (Indian players with 7000 plus T20 runs)

विराट कोहली
रोहित शर्मा
शिखर धवन
सुरेश रैना
रॉबिन उथप्पा
एम एस धोनी*

धोनी अगोदर विराट कोहली, रोहित शर्मा आदी ५ खेळाडूंनी टी-२०मध्ये ७ जार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.

अधिक वाचा –

युवराजची विकेट घेतल्यामुळे ‘हा’ खेळाडू बनला टी२० क्रिकेटचा चँपियन, धोनीच्या सीएसकेचा आहे हुकुमी एक्का

मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील

‘थाला’प्रेम! चाहत्याने ओरडून म्हटले, ‘तूच सदैव राहशील माझा कर्णधार’; धोनीने असे केले रिऍक्ट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---