---Advertisement---

धोनीच्या सीएसकेने आधी बनवले कोट्याधीश, नंतर केले बाहेर; आता त्यानेच संघाला मिळवून दिलायं विजय

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 2:13 PM
MS Dhoni & K Gowtham & DJ Bravo
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यातील काहींनी ती कामगिरी तशीच सुरू ठेवत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले एक स्थान निर्माण केले आहे. मात्र त्यातील काहींना देशासाठी खेळण्याची संधी न मिळाल्याने त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. असाच एक खेळाडू जो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिला आहे. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू ठरला. त्याला आयपीएलमध्ये कमी संधी मिळाली असली तरी त्याने महाराजा टी२० लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला आहे.

कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याला आयपीएल २०२१च्या हंगामात एमएस धोनी याच्या चेन्नईने ९.२५ कोटी रूपयांना विकत घेतले होते. त्याच्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजूनही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तर २०२२च्या लिलावामध्ये त्याला चेन्नईने मोकळे केले, त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने त्याला ९० लाख रूपयांना विकत घेतले.

लखनऊकडून खेळताना गौतमने २०२२च्या आयपीएलमध्ये ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. आता त्याने सुरू असलेल्या महाराजा टी२० ट्रॉफीमध्ये अष्टपैलू खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. तो या लीगमध्ये शिवमोगा स्ट्रायकर्सकडून खेळत आहे. त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद आहे. त्याने मंगलोर युनायटेडच्या विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे.

गौतमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मंगलोरने २० षटकात ८ विकेट्स गमावत १३६ धावा केल्या. यावेळी गौतमने गोलंदाजी करताना ४ षटकात ११ धावा देत २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने अभिनव मनोहर याची महत्वाची विकेट घेतली. मनोहरने २५ चेंडूत ३६ धावा केल्या. तसेच गौतमने एम वेंकटेश याचीही विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना गौतमने तिसऱ्या क्रमांकावर २२५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने ३२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकार फटकारत ७२ धावा केल्या. त्याच्या या तुफानी खेळीने शिवमोगाने १२.२ षटकातच लक्ष्या पार करत सामना ८ विकेट्सने जिंकला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---