आयपीएल २०२० संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी उत्साहित आहेत. दुसरीकडे, एमएस धोनीच्या चाहत्यांची नजर पुन्हा एकदा दुबईकडे लागली आहे. कारण, धोनी आयपीएल संपल्यानंतर पुन्हा एकदा दुबईत पोहोचला आहे. धोनी आपल्या कुटूंबासह दुबईमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. धोनीचा दुबई येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डान्स करताना दिसतोय. धोनीसह त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवादेखील डान्स करताना दिसत आहेत.
पत्नी आणि मुलीसह डान्स करताना दिसला धोनी
धोनी अनेकदा सराव आणि जिममध्ये कठोर परिश्रम घेताना दिसत असतो. याशिवाय तो फावल्या वेळेत भारतीय सैन्यासोबत देखील वेळ घालवताना दिसला आहे. मात्र, धोनीचा डान्स करतानाचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आलेला आहे. हा व्हिडिओ दुबईतील एका पार्टीतील असल्याचे सांगण्यात येतेय. धोनीबरोबरच त्याची मुलगी झिवा आणि पत्नी साक्षीचेही पाय थिरकताना दिसतायेत. तसेच, धोनीचे काही मित्रही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. धोनीचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडिओला दिले गेले मजेशीर कॅप्शन
चेन्नई सुपर किंग्सने हा व्हिडिओ शेअर करताना एक मजेशीर कॅप्शन दिले आहे. ‘तुम्ही हा व्हिडिओ पाहताना हसणे थांबवू शकता का ? निश्चितच नाही ! ( Definitely Not )’
आयपीएल २०२० वेळी चेन्नई सुपर किंग्सच्या अंतिम साखळी सामन्यापूर्वी समालोचक डॅनी मॉरीसन यांनी धोनीला विचारले होते की, ‘ हा तुझा आयपीएलमधील अखेरचा सामना आहे का ? त्यावर धोनीने ‘ Definitely Not’ असे उत्तर दिले होते. त्यानंतर, सोशल मीडियावर #DefinitelyNot हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.
Can we stop ourselves from smiling while watching this? Definitely Not. 😊 #WhistlePodu #Yellove @msdhoni @SaakshiSRawat 🦁💛 pic.twitter.com/cuD8x3J7oS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 26, 2020
धोनी व चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएलचा तेरावा हंगाम ठरला होता निराशाजनक
आतापर्यंत आयपीएलच्या सर्व हंगामात प्ले-ऑफ्सपर्यंत मजल मारलेल्या चेन्नईला तेराव्या हंगामात सातव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. संघासोबत धोनीची वैयक्तिक कामगिरीही तितकीशी चांगली राहिली नव्हती. धोनीच्या अनेक निर्णयांवर चौफेर टीका झालेली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या महत्त्वाच्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट खोटा?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री
Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश