---Advertisement---

एमएस धोनीला असा डान्स करताना पाहिले आहे का?

On: सोमवार, डिसेंबर 3, 2018 1:28 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. तसेच तो या सुट्ट्यांमध्ये त्याच्या कुटुंबासमवेतही वेळ घालवताना दिसून आला आहे.

नुकतेच त्याने त्याची 3 वर्षाची मुलगी झिवाबरोबरचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी आणि झिवा डान्स करताना दिसत आहेत. तसेच झिवा त्याला डान्सच्या काही स्टेप्सही शिकवत आहे आणि धोनीही तिच्याप्रमाणे डान्स करत आहे. हा बाप-लेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Bq426bHFuLd/

झिवाही सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी ‘स्टार किड्स’पैकी एक आहे. त्यामुळे तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. तिचे इंस्टाग्रामवर अकांउंटही आहे. त्याला जवळजवळ 50 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्सही आहेत.

धोनीने काही दिवसांपूर्वीही झिवाबरोबरील व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात हे दोघे भोजपुरी आणि तमिळ भाषेत संवाद साधताना चाहत्यांना पहायला मिळाले होते.

https://www.instagram.com/p/BqkNuygFlVi/

त्याचबरोबर धोनी नुकताच जेएचसी क्रिकेट क्लब, रांची, झारखंड येथे सुरु असलेल्या स्थानिक टेनिस स्पर्धेत सामील झाला होता. तसेच त्याने या स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपदही जिंकले आहे.

धोनीला मागील महिन्यात विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. त्यामुळे तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारीमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल असे अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस

हॉकी विश्वचषक २०१८: रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियम विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment