१५ ऑगस्ट २०२० रोजी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला शेवटचा राम राम करताना लिहिले की, “सर्वांच्या प्रेमासाठी आभार. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला निवृत्त समजा.” धोनीच्या पुनरागमनाची वाट पाहणारे चाहते अचानक निवृत्तीची ही पोस्ट पाहून हक्केबक्के झाले.
धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक चाहते आणि क्रिकेटपटू त्याला मिस करत आहेत. मिस करणाऱ्या व्यक्तींमध्ये धोनीची मुगली झिवाचाही समावेश आहे. झिवाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मिस यू अँड आवर बाईक राइड्स.”
त्या फोटोमध्ये झिवा एका बॅगमध्ये बसलेली दिसत आहे. तिच्या बाजूला धोनी हसताना दिसत आहे. तिच्या या फोटोला झिवा आणि धोनी दोघांच्याही चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दाखवली आहे. अनेकांनी खूप चांगल्या कमेंट्सही केल्या आहेत. MS Dhoni Daughter Ziva Miss Him And His Bike Rides
परंतु काही काळानंतर तिच्या अकाऊंटवरीला ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे.
Ziva Missing papa & bike rides with him 😍❤️#MSDhoni #Dhoni #Ziva pic.twitter.com/GjcnIhjr4y
— Dhoni Raina Team (@dhoniraina_team) August 18, 2020
धोनी १९ सप्टेंबरपासून युएईत सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईला गेला आहे. तिथे चेन्नई सुपर किंग्स संघाचा सराव शिबिर आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २१ किंवा २२ ऑगस्टला सीएसके युएईला रवाना होणार आहे.
धोनी सोशल मीडियावर जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येत नाही. पण त्याची पत्नी साक्षी धोनी आणि झिवा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमी मजेदार फोटो शेअर करत असतात. झिवा सोशल मीडियावरील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर १६ लाखापेक्षाही जास्त फोलोवर्स आहेत. तिचे हे अकाउंट धोनी आणि साक्षी हँडल करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
सीपीएल २०२०: पहिल्या सामन्याआधी सेंट ल्युसिया झुक्स संघाच्या नव्या जर्सीचे झाले अनावरण
‘एमएस धोनीने निवृत्ती घेतली म्हणून आता मीही निवृत्ती घेणार’,पहा कोण म्हणतंय
…म्हणून सचिन बीसीसीआयला म्हणाला, धोनीलाच बनवा कर्णधार
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
एमएस धोनीच्या कारकिर्दीत झाले हे ५ मोठे वाद, ज्यात अडकला तो स्वत:च
या ४ अभिनेत्रींबरोबर जोडले गेले होते एमएस धोनीचे नाव