---Advertisement---

वय सोडा, कामगिरी पाहा! आयपीएलमध्ये ‘असा’ कारनामा फक्त धोनी अन् कार्तिकलाच जमलाय, टाका एक नजर

On: शनिवार, मे 28, 2022 11:30 PM
Dinesh-Karthik-And-MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या हंगामात अनेक खेळाडूंनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) खेळला जाणार आहे. यावर्षी अनेक अनकॅप्ड खेळाडूंनी असे प्रदर्शन केले, ज्यामुळे लवकरच त्यांचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाची शक्यता निर्माण झाली आहे, तर काही दिग्गज खेळाडूंसाठी देखील हा हंगाम महत्वाचा ठरला आहे. अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने यावर्षी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. कार्तिकने एमएस धोनीच्या एका खास विक्रमाची बरोबरी देखील केले आहे.

आयपीएल संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशीत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. दिनेश कार्तिक (Dinesh karthik) आयपीएल २०२२ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता आणि त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. याच कारणास्तव मोठ्या काळानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत कार्तिक खेळताना दिसू शकतो.

आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) हा एकमेवर फलंदाज होता, जो एका हंगामात १० वेळा नाबाद राहिला होता. पण आता या यादीत दिनेश कार्तिक हे नाव सामील झाले आहे. धोनीने ही कामगिरी आयपीएल २०१४ मध्ये केली होती, जी कार्तिकने यावर्षी पुन्हा प्रत्यक्षात उतरवली. धोनीने २०१४ साली नाबाद १४*, १३*, २२*, १२*, २२*, २६*, २१*, ५७*, ४९*, ४२* अशी कामगिरी केली होती, तर कार्तिकने चालू हंगामात नाबाद ३२*, २५*, ४४*, ७*, ६६*, १३*, २६*, ३०*, २*, ३७* अशी कामगिरी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात फक्त हे दोघेच एका हंगामात १० वेळा नाबाद राहू शकले आहेत.

दरम्यान, कार्तिकचे हे प्रदर्शन चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खूप महत्वाचे ठरले. मेगा लिलावात आरसीबीने कार्तिकसाठी मोठी रक्कम खर्च केली होती आणि त्यांच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न देखील उपस्थित केला होता. परंतु आता कार्तिकचे हे प्रदर्शन पाहून सर्वाना उत्तर मिळाले आहे. संपूर्ण हंगामात त्याने १६ सामने खेळले ज्यामध्ये ५५च्या सरासरीने आणि १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ३३० धावा केल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुरहारीने साकारला युपीएसएचा विजय; परशुरामियन्सचा विजयासाठी संघर्ष

‘विराट अन् अश्विन चांगले पंच बनू शकतात’, असे का म्हणाले ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज अंपायर?

Video। सुरक्षा घेरा तोडत विराटच्या फॅनची मैदानात एंट्री, कोहलीला भेटल्यानंतर जोमात लागला नाचू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---