भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा जागतिक क्रिकेटमध्ये एक दिग्गज यष्टीरक्षकाबरोबरच महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत कर्णधार म्हणून धोनीने जवळपास सर्वच मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या धोनी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. या दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझाने धोेनीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितले आहे की धोनी आपल्या संघातील खेळाडूंना सामन्याआधी शुभेच्छा देत नाही. त्यामागील कारणही ओझाने सांगितले आहे.
एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ हंगामामध्ये व्यस्त असून त्याच्या चेन्नई संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यादरम्यान ओझाने धोनीशी संबंधित एक महत्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, “धोनी सामन्यापूर्वी त्याच्या संघातील सदस्यांना शुभेच्छा देत नाही किंवा ऑल द बेस्ट म्हणत नाही. कारण त्याला असे वाटते की जर एखाद्या खेळाडूला शुभेच्छा मिळाल्या तर त्याची सामन्यातील कामगिरी चांगली होणार नाही. म्हणूनच कदाचित आता त्याने शुभेच्छा देणे थांबवले आहे.”
तसेच पुढे तो म्हणाला की, धोनीला विरोधी संघातील खेळाडूंनाही शुभेच्छा द्यायला आवडत नाहीत. तो म्हणाला, “एकदा आम्ही लोकांकडे खूप वेगळ्या प्रकारच्या भावना असतात यावर चर्चा करत होतो, तेव्हा धोनाने सांगितले की त्याला खेळापूर्वी कोणत्याही खेळाडूला शुभेच्छा देण्याची इच्छा होत नाही. जरी तो खेळाडू विरोधी संघातील असला तरी.”
एमएस धोनी हा जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने भारतीय संघाला आयसीसीचे तीनही चषक जिंकवून दिले आहेत. तर या व्यतिरिक्त आयपीएलमध्येही त्याने चेन्नई सुपर किंग्सला ३ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम
माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण