मुंबई । भारतीय क्रिकेट संघातला वरिष्ठ खेळाडू आणि यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनी गेल्या 11 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटच्या मैदानावर त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स आतुर आहेत. क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीने कोरोना काळात आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. याच दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये धोनी ट्रॅक्टर चालवताना दिसून येत आहे.
Let’s start sowing the seeds ft. MS Dhoni..🤓#Dhoni #Ranchi #MahiWay pic.twitter.com/Z353QFSmJF
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) June 28, 2020
इन्स्टाग्रामवर ‘धोनी भक्त’ नावाने एक पेज आहे. यावर या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला कॅप्शनमध्ये लिहिले की, “धोनी भाई ऑर्गेनिक शेती करताना ‘एन्जॉय’ करत आहे.”
एमएस धोनीने विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या वनडे सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती. तो आयपीएलमध्ये खेळताना दिसून येईल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. पण आयपीएल स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला चेन्नई सुपरकिंग संघाने ट्रेनिंग कॅम्प सुरु केले होते. या ट्रेनिंग कॅम्पमध्ये धोनीने सहभाग घेतला होता. सराव करताना जबरदस्त चौकार आणि षटकारही ठोकले होते. त्याची फलंदाजीची झलक पाहण्यासाठी क्रिकेट फॅन्स खूपच आतूर झाले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा बीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. बीसीसीआय कोणत्याही परिस्थितीत आयपीएल भरविण्याच्या विचारात आहे. यासाठी नियोजन करत आहे. यंदाच्या वर्षातील आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्या तर बीसीसीआय आयपीएलचे आयोजन करू शकतो,अशी माहिती पुढे येत आहे. मात्र बीसीसीआयने या वृत्ताला अजून दुजोरा दिला नाही.