भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १ लाख रुपयांची मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईत दिली आहे. त्याने ही रक्कम मुकुल माधव फाऊंडेश, पुणे येथील संस्थेला दिली आहे. यातून १०० परिवांराला अन्नपुरवठा केला जाणार आहे.
एका वृत्तानुसार, धोनी पुण्यातील १०० कुटूंबांसाठी १४ दिवस पुरेल एवढ्या रेशनसाठी पैसे देणार आहे. यात तांदूळ, तेल व इतर वस्तुंचा समावेश आहे. यामुळे या १०० कुंटूंबांचे दैनंदिन जगणं सुरळीत चालेल. (MS Dhoni donates ₹1 lakh to aid daily wage workers’ families in Pune.)
धोनी हे पैसे क्राऊंड फंडिंगची वेबसाईट केट्टोच्या मार्फत देणार आहे. यापुर्वी क्रिकेटपटूंमध्ये पठाण बंधूंनी मेहमूद खान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ४ हजार मास्क नागरिकांना दिले आहेत. तर सौरव गांगुलीनेही ५० लाख रुपयांचा तांदूळ नागरिकांसाठी दिला आहे. मुंबई क्रिकेट असोशियनशनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपये दिले आहेत.
धोनी विश्वचषकापासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो गेल्या आठवड्यात चेन्नई येथे आयपीएलसाठी सराव करत होता. तसेच तो काही सरावसामने देखील खेळला.
तसेच तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा २०१६ हंगामात कर्णधारही राहिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-२६ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी सचिनला या खेळाडूने केले होते क्रिकेटमधील ओपनर
-एकट्या विराट कोहलीचा पगार पाकिस्तानच्या २६ टाॅप क्रिकेटर्स एवढा
-टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये विजयांचा डोंगर उभे करणारे ५ कर्णधार