---Advertisement---

एमएस धोनी, पार्थिव पटेल बनले बाथरुम सिंगर, पहा व्हिडिओ

On: बुधवार, फेब्रुवारी 19, 2020 2:35 PM
---Advertisement---

बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आयपीएल 2020मध्ये (IPL 2020) खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) नेतृत्व करतानाही दिसणार आहे. परंतु त्यापूर्वी तो सध्या सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे.

सध्या धोनी संघाबाहेर असल्यामुळे तो पार्टींमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर धोनीला गाणी ऐकण्याची व गाण्याची आवड आहे. परंतु आता धोनीने एका वेगळ्याप्रकारे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. धोनी टॉयलेटमध्ये एका गायकाचे गाणे ऐकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात टॉयलेटमध्ये गायक ईशान खान आपले गाणे धोनीला ऐकवताना दिसत आहे. यामध्ये गायक ईशान खाली बसून सर्वांना ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ हे गाणे ऐकवत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलही (Parthiv Patel) दिसत आहे.

हा व्हिडिओ एका मोठ्या हॉटेलच्या टॉयलेटमध्ये मोबाईलने शूट केलेला आहे. या व्हिडिओत धोनी, ईशान आणि पार्थिव व्यतिरिक्त हॉटेलचे काही कर्मचारीही दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

त्याचबरोबर धोनी क्रिकेटपासून दूर असून तो सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. जुलै 2019च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनीने आतापर्यंत भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही.

बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या वार्षिक मानधन करारातून धोनीला वगळण्यात आले होते. त्यानंतर धोनी पुन्हा संघात खेळेल की नाही असे प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु आता आयपीएलनंतर धोनी भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता असल्याची चर्चा केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---