---Advertisement---

एमएस धोनीचा हा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल…

On: शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2019 7:10 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आयसीसी विश्वचषक 2019 स्पर्धेनंतर क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. क्रिकेटमधील विश्रांती दरम्यान, धोनी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याव्यतिरिक्त इतर खेळही खेळताना दिसत आहे. त्यामुळे तो क्रिकेटपासून दूर असला तरी सातत्याने चर्चेत असतो.

असा सध्या तो एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. बालदिना निमित्त14 नोव्हेंबरला एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी एक लहान मुलीला एक पदार्थ खाऊ घालताना दिसत आहे.

एमएस धोनी आणि या लहान मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप भावला आहे.  तसेच चाहत्यांनी त्याच्या साधेपणाचे कौतुकही केले आहे.

हा व्हिडिओ त्या लहान मुलीच्या अन्नप्राशन विधी दरम्यानचा असल्याचे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. 

 

आयसीसी विश्वचषक 2019 नंतर धोनी भारतीय संघाकडून खेळलेला नाही. पण तो कदाचित पुढिल महिन्यात होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---