---Advertisement---

जन्माष्टमीच्या खास प्रसंगी ‘कॅप्टन कूल’ धोनी वाजवतोय बासरी; व्हिडिओ झाला व्हायरल

On: बुधवार, ऑगस्ट 12, 2020 1:00 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊनची परिस्थिती होती, तेव्हा धोनीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होते. त्यानंतर आता मंगळवारी (११ ऑगस्ट) जन्माष्टमीच्या (श्री कृष्ण जयंती) निमित्ताने धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी बासरी वाजवताना दिसत आहे.

धोनीने वाजविली बासरी

धोनीचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओत धोनीने निळ्या रंगाची जर्सी घातली आहे. सोबतच त्याने गॉगल्स घातले आहेत. तो आपल्याच धुंदीत बासरी वाजवत आहे.

हा व्हिडिओ जुना आहे आणि श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सीएसकेने धोनीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

२२ ऑगस्टला धोनी जाणार यूएईला

माध्यमांमध्ये असे वृत्त येत आहे की, सीएसकेचा संघ २२ ऑगस्टला यूएईला रवाना होणार आहे. यूएईला जाण्यापूर्वी सीएसकेचे एक शिबिर लागणार आहे. त्यामध्ये सर्व खेळाडू सामील होणार आहेत.

धोनीसमवेत सुरेश रैनानेही (Suresh Raina) आयपीएलच्या तयारीला सुरुवात केली आहे. रैनाच्या फलंदाजी आणि प्रशिक्षणाचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असता.

तसं पाहिलं तर धोनीचा (MS Dhoni) सराव करतानाचा कोणताही व्हिडिओ समोर आलेला नाही. धोनीने मागील एक वर्षांपासून क्रिकेटचा एकही सामना खेळला नाही. २०१९मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यापासून धोनी भारतीय संघातून बाहेर आहे. धोनी मार्च महिन्यात आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.

आता आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे, तेव्हा धोनीच्या चाहत्यांना धोनीला जवळपास १ वर्षांनंतर खेळताना पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे

-मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा

-श्रीलंकन लीगच्या संघांनी ठेवली आयपीएल संघांशी मिळतीजुळती नावे, मग काय चाहत्यांनी सुरू केले ट्रोलिंग…

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमधील धुव्वांदार फलंदाज व त्यांची आवडती मैदान जिथं ते गोलंदाजांना देत नाहीत सुट्टी

-आयपीएलमधील ५ धाकड फलंदाज, ज्यांनी एक नव्हे तर २ वेगवेगळ्या संघांकडून ठोकली आहेत शतकं

-फलंदाजांना रडकुंडीला आणणारे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ५ सर्वात यशस्वी गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---