---Advertisement---

मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा

On: मंगळवार, ऑगस्ट 11, 2020 10:22 PM
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान फिरकीपटू यासिर शाहविरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वाईट भाषेचा वापर केला होता. त्यामुळे मॅच रेफरी आणि वडील ख्रिस ब्रॉड यांनी त्याच्यावर सामन्याच्या १५ टक्के दंड लावला आहे. ही घटना पाकिस्तान संघाच्या दुसऱ्या डावाच्या ४६ व्या षटकामधील आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अयोग्य भाषा, कृती किंवा हावभाव संदर्भात ब्रॉड आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. यासोबतच त्याच्या शिस्त रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉईंट जोडला गेला. २४ महिन्यांतील हा त्याचा तिसरा गुन्हा आहे आणि एकूण डिमेरिट पॉईंट्स हे तीन झाले आहेत.

वडील रेफरीने आपल्याच मुलाला शिक्षा दिल्याचा क्रिकेट इतिहासातील हा अनोखा क्षण होता. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मॅच रेफरी हे स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड होते. अशामध्ये ब्रॉड यांनी आपल्याच मुलाच्या चूकीवर आयसीसीकडून शिक्षा सुनावली आहे.

ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे. ब्रॉडने आपल्या वडिलांद्वारे सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया देत ट्वीट केले आहे.

ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी २५ कसोटी आणि ३४ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ३९.५४ च्या सरासरीने १६६१ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्यांनी कसोटीत ६ शतकेही ठोकली. त्याचबरोबर वनडेत त्यांनी ४०.०२ च्या सरासरीने १३६१ धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान संघाला ३ विकेट्सने पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १३ ऑगस्ट रोजी खेळला जाईल. इंग्लंड आणि पाकिस्तान संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-सनरायझर्स हैद्राबादच्या स्टार विकेटकिपरची बायको चालवते रेस्‍टॉरेंट, पतीबरोबर जाते विविध देशांच्या दौऱ्यावर

-हैराण करणारा विक्रम! आयपीएलमध्ये ४८ चेंडू खेळून एकही चौकार मारु न शकलेले क्रिकेटर

-पाकिस्तानबरोबर खराब प्रदर्शनामुळे जेम्स अँडसरनचं करियर संपलं? पहा काय म्हणतोय स्वत: अँडसरन

ट्रेंडिंग लेख –

-बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय

-आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळाडूंकडून होऊ शकतात हे ५ बहुचर्चित विक्रम

-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---