जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेकदा चौकार आणि षटकारांचा वर्षांव होताना दिसतो. आयपीएल इतिहासात आतापर्यंत अनेक जबरदस्त फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी ताबडतोब खेळी केल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे, ब्रेंडन मॅक्युलम. मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १५८ धावांची तूफानी खेळी केली होती. यामध्ये १० चौकारांचा आणि १३ षटकारांचा समावेश होता.
मॅक्युलमसह आयपीएलमध्ये ताबडतोब फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत हार्दिक पंड्या, ख्रिस गेल, एबी डिविलियर्स, शेन वॉटसन, सुरेश रैना, एमएस धोनी, जोस बटलर, ऍरोन फिंच अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, कोणत्याही फलंदाजाला ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज भासते. जेवढे जास्त चेंडू सीमारेषेबाहेर जातात, तेवढी त्या फलंदाजाच्या प्रसिद्धीत वाढ होते.
आयपीएल इतिहासात आजवर सर्वाधिक षटकार मारण्याऱ्या भारतीय खेळाडूंविषयी बोलायचे झाले तर, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीचा यात पहिला क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामन्यात २०९ षटकार मारले आहेत. तर, १९४ षटकारांसह रोहित शर्मा (१८८ सामने) आणि सुरेश रैनाचा (१९३ सामने) अनुक्रमे दूसरा आणि तिसरा क्रमांक लागतो. तसेच, विराट कोहली या यादीत १९० षटकारांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
परंतु, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील सर्व खेळाडूंच्या यादीमध्ये पहिला आणि दूसरा क्रमांक हा परदेशी खेळाडूंनी पटकावला आहे. तर, पुढील तीन क्रमांकावर भारतीय खेळाडूंचा राज आहे.
चला तर बघूयात, नक्की कोण आहेत हे ५ खेळाडू, ज्यांनी आयपीएलमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार – (Top-5 Batsman Who Hit Most Sixes In IPL History)
५. सुरेश रैना –
‘मिस्टर आयपीएल’ नावाने प्रसिद्ध सुरेश रैना हा एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख फलंदाज आहे. रैनाची विशेषता ही आहे की, तो नेहमी समजदारीने फलंदाजी करतो. वरच्या फळीत फलंदाजीला उतरल्यानंतर फलंदाजाने कशाप्रकारे कामगिरी करायला पाहिजे, यात रैना तरबेज आहे.
कदाचित त्याच्या या वैशिष्ट्यामुळे रैनाने आयपीएलमध्ये १९३ सामने खेळत ५३६८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १९४ षटकार मारत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. सोबतच त्याने आयपीएलमध्ये ४९३ चौकार मारले आहेत.
रैनाने आयपीएलमध्ये एक शतक आणि ३८ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. याबरोबरच रैना हा आयपीएलमधील एकमेव फलंदाज आहे, ज्याने आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ३००पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला आहे.
४. रोहित शर्मा –
हिटमॅन रोहित शर्मा हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. रोहित मैदानावर उतरला की, चौकार-षटकारांचा वर्षाव होताना दिसणे साहजिक आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९४ षटकार मारले आहेत.
सुरेश रैना आणि रोहितच्या आयपीएलमधील षटकारांची संख्या सारखीच आहे. परंतु, रोहितने रैनापेक्षा कमी सामन्यात १९४ षटकार मारले आहेत, त्यामुळे तो या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. रोहितने आयपीएलमध्ये १८८ सामन्यात ४८९८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४३१ चौकरांचाही समावेश आहे. तसेच, त्याने आयपीएलमध्ये १ शतक आणि ३६ अर्धशतके केली आहेत.
रोहितने त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. त्याचा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद पटकवाणारा पहिला संघ आहे.
३. एमएस धोनी –
आयपीएल इतिहासातील दूसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणजे एमएस धोनी. धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघाला ३वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसं तर, धोनी परिस्थितीनुसार फलंदाजी करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९० सामने खेळत २०९ षटकारांच्या मदतीने ४४३२ धावा केल्या आहेत. त्याच्या २०९ षटकारांमुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
धोनीने आयपीएलमध्ये २९७ चौकार मारले आहेत. परंतु, त्याला आयपीएलमध्ये एकही शतक मारण्यात यश आले नाही. तरी त्याने आयपीएलमध्ये २३ अर्धशतके केली आहेत.
२. एबी डिविलियर्स –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दूसरा फलंदाज आहे. आजवर डिविलियर्सने आपल्या विस्फोटक खेळीने संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपएलमध्ये त्याच्या सर्वाधिक धावा या नाबाद १३३ इतक्या आहेत.
डिविलियर्सने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १५४ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २१२ षटकार मारत ४३९५ धावा केल्या आहेत. शिवाय त्याचा स्ट्राईक रेटही १५१.२३ इतका आहे.
१. ख्रिस गेल –
‘युनिव्हर्सल बॉस’ नावाने प्रसिद्ध असणारा ख्रिस गेल हा आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज आहे. त्याने आयपीएलमध्ये इतके षटकार मारले आहेत की, त्याच्या षटकारांच्या जवळपासही कोणताही फलंदाज पोहोचू शकला नाही. शिवाय, आयपीएल आणि टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक धावा (नाबाद १७५) करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १२५ सामन्यात ४४८४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३२६ षटकारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये ३०० षटकारांचा आकडा पार करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख –
बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय
एक नाही तर दोन देशांकडून इंटरनॅशनल टी२० क्रिकेट खेळलेले ५ अवलिया
आयपीएलच्या माध्यमातूनच २०२१ टी२० विश्वचषकाची जोरदार तयारी करणार हे ५ क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या –
नाईकीचा करार संपल्यावर या दोन कंपन्यात आहे मोठी स्पर्धा, एक होणार टीम इंडियाची कीट स्पॉन्सर
कर्णधार झालेला हा क्रिकेटर करतोय आयपीएलची जोरदार तयारी, रोहित-विराटच्या टीमला करणार चितपट






