आयपीएल 2023च्या 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने 7 विकेट्स राखून विजय मिळवला होता. अजिंक्य रहाणे सीएसकेसाठी मॅच विनरची भूमिका बजावू शकला. रहाणेने अवघ्या 27 चेंडूत 61 धावा कुटल्या. दुसरीकडे सीएसकेने देखील नेहमीप्रमाणे कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असणाऱ्या खेळाडूला पुन्हा एकदा संधी दिली.
अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज असला, तरी मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसला नाहीये. नुकतेच बीसीसीआयने आगामी वर्षासाठी खेळाडूंचे करार जाहीर केले. रहाणेला मात्र यावर्षी बीसीसीआयसोबत करार देखील मिळाला नाहीये. येत्या काळात रहाणेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळणार नाही, याचे हे एकप्रमारे संकेत म्हणता येऊ शकतात. असे असले तरी, सीएसकेने दिलेल्या संधीचे रहाणेने सोने केले. शनिवारी (8 एप्रिल) झालेल्या मुंबई-चेन्नईच्या सामन्यात रहाणे सर्वात्तम फलंदाजी करू शकला.
या सामन्यात सीएसकेला विजयासाठी 20 षटकांमध्ये 158 धावा करायच्या होत्या. रहाणेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर संघाने अवघ्या 18.1 षटकात हे लक्ष्य गाठले. त्याने अवघ्या 19 षटकांमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, ह चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत सर्वात वेगवान ठरले. रहाणे मागच्या मोठ्या काळापासून भारताचा कसोटी फलंदाज म्हणून खेळत आला आहे. अशात टी-20 क्रिकेटमध्ये त्याने भारतासाठी जास्त क्रिकेट खेळले नाही. अशात शनिवारची खेळी त्याच्या टी-20 कारकिर्दीसाठी नवसंजीवनी ठरू शकते. सीएसकेने यापूर्वीही रहाणेप्रमाणे कारकीर्द संपण्याच्या मार्गावर असणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे.
आयपीएल 2021 मध्ये सीएसकेने रॉबिन उथप्पा () याला संधी दिली होती. रहाणेप्रमाणे उथप्पा देखील मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेताना दिसला होता. राजस्थान रॉयल्ससाठी 2020 हंगामात उथप्पाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नव्हते. पण 2021 सीएसकेसाठी त्याने चमकदार कामगिरी केली. क्लाविफायर सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकत सीएसकेला विजय मिळवून दिला होता. “सीएसके एक विश्वासनीय फ्रँचायझी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यावेळी उथप्पाने दिली होती. तत्पूर्वी उथप्पा धोनीच्या नेतृत्वात 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. (MS Dhoni gave a chance to those who were said to have finished their careers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा सर्वोत्तम फिनिशर! रिंकू सिंगने डेविड मिलरसह धोनीचा मोठा विक्रमही मोडला
अहमदाबादमध्ये रिंकूचा इतिहास! अखेरच्या 5 चेंडूवर 5 षटकार ठोकत केकेआरला मिळवून दिला थरारक विजय