---Advertisement---

पुन्हा तेच! धोनीने पुन्हा पळवले चाहत्याला पण चेन्नई सुपर किंग्जच्या

On: सोमवार, मार्च 18, 2019 5:09 PM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा भारतातच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या लाडक्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी, त्याच्याबरोबर एक फोटो काढण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करतात. त्यात काही चाहते तर चक्क सुरक्षा रक्षकांची नजर चूकवून सामना सुरु असताना मैदानातही घुसतात.

असेच एक चाहता चेन्नई सुपर किंग्जचा संघाचा सराव सुरु असताना धोनीला भेटण्यासाठी अचानक मैदानात आला. पण विशेष म्हणजे यावेळी धोनीनेही त्याला सहज न भेटता त्याच्याशी थोडी मस्ती केली. याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की ज्यावेळी हा चाहता धोनीला भेटायला आला तेव्हा धोनी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीच्या भोवती त्याचा शर्टला धरुन फिरत होता आणि हा चाहताही त्याचा पाठलाग करत होता. त्यानंतर धोनी दूर पळाल्यावरही तो चाहता त्याच्या मागे गेला. त्यानंतर मात्र सुरक्षारक्षकांनी येऊन त्या चाहत्याला धरले. यावेळी लगेचच धोनीने त्या चाहत्याशी हात मिळवला.

चेन्नई सुपर किंग्सने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘कॅच मी इफ यू फॅन(जर तू चाहता असशील तर मला पकड)’

पण याचबरोबर असा प्रकार करण्याचा कोणत्याही चाहत्याने पुन्हा प्रयत्न करु नये असेही, चेन्नईने पुढे ट्विट केले.

या सारखाच प्रकार 5 मार्चला नागपूरमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या वनडे सामन्यात पहायला मिळाला होता. या सामन्यादरम्यानही एक चाहता अचानक सुरक्षा रक्षकांना भूल देत धोनीला भेटण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळीही त्या चाहत्याची धोनीने मजा घेतली होती.

त्यावेळी धोनी संघसहकाऱ्यांच्या अवतीभवती पळत होता. त्यामुळे त्या चाहत्यानेही त्याचा पाठलाग केला होता.

23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ एमए चिदम्बरम स्टेडियमवर सराव करत आहे. हा सराव पाहण्यासाठी या मैदानावर 12 हजारपेक्षाही जास्त चाहत्यांनी हजेरी लावली होती. या सरावादरम्यानचेही काही फोटो आणि व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 23 मार्चला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

स्टिव्ह स्मिथचे झाले राजस्थानच्या संघात रॉयल स्वागत…

चेन्नई सुपर किंग्जच्या अँथम साँगवर धोनी, केदार, हरभजनने धरला ठेका, पहा व्हिडिओ

कॅप्टनकूल एमएस धोनीने वाचवले या भारतीय गोलंदाजाचे करियर…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment