आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा धक्का दिला. यासह सीएसके संघाच्या नावावर पाचवी आयपीएल ट्रॉफी झाली. संघाचा कर्णधार एमएस धोनी याने त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी त्याच्या गुडघ्यावरील ही शस्त्रक्रिया पार पडली.
धोनी संपूर्ण हंगामात आपल्या गुडघ्याच्या दुखापतीसह खेळताना दिसला. हंगामातील पहिल्या सामन्यावेळीच त्याचा गुडघा दुखत असल्याचे संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले होते. अशा परिस्थितीतही आईस पॅक लावून तो खेळताना दिसला. त्यानंतर आयपीएल संपताच त्याने शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबला. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्था येथे एमएस धोनी (MS Dhoni) याच्यावर उपचार झाले. गुरुवारी (1 जून) प्रख्यात डॉ. दिनशॉ पारडीवाला (dr dinshaw pardiwala) यांनी धोनीची सर्जरी केली. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याची अगदी अवघड शस्त्रक्रिया देखील डॉ. पारडीवाला यांनीच केली होती
या शस्त्रक्रियेनंतर त्याला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल असे सांगण्यात येत होते. मात्र, गुरुवारी सायंकाळीच त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मिळत असलेल्या माहितीनुसार तो पूर्णपणे बरा होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी लागेल. दोन महिन्यानंतर धोनी पुन्हा एकदा धावू शकेल.
यावर्षी धोनी आपली अखेरची आयपीएल खेळत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याने आपण निवृत्त होत नसल्याचे जाहीर केले. आयपीएलच्या पुढील मिनी ऑक्शनसाठी अद्याप आठ नऊ महिन्यांचा कालावधी आहे. त्या काळात आपला फिटनेस योग्य राहिल्यास आपण पुन्हा एकदा आयपीएल खेळू असे वचन त्याने दिले आहे
(MS Dhoni Getting Discharge From Hospital After Succesful Knee Injury In Mumbai)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता
धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार