इंडियन प्रीमियर लीगमधील ५० वा सामना (आयपीएल २०२१) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही अव्वल संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने या सामन्यात विजय मिळवला असला तरी, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने केलेल्या संथ खेळीची सगळीकडे चर्चा होती. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. धोनीवर अत्यंत मजेदार मीमदेखील बनवले गेले.
धोनीची संथ खेळी
गुणतालिकेतील पहिले स्थान पटकावण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना धोनीने २७ चेंडूत १८ धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ६६.६७ असा निराशाजनक राहिला. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी ठरली. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याला ट्रोल केले.
एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
‘धोनी हा निसंकोचपणे भारताचा सर्वात उत्कृष्ट कसोटीपटू आहे.’
Undoubtedly India's best Test Batsman MS Dhoni 🔥🔥 https://t.co/eP5wsloqxH pic.twitter.com/0SsloF2xpK
— HITMAN ROCKY 😎 (@HITMANROCKY45_) October 4, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने तर, धोनीला चेन्नईच्याऐवजी कसोटी जर्सीमध्ये दाखवले. त्याने त्याला कॅप्शन देत लिहिले,
‘धोनी कसोटी क्रिकेट खेळणे मिस करतोय म्हणून, टी२० मध्ये अशी खेळी करतोय.’
Dhoni was Missing test cricket so he played test in t 20…
King for a reason 🤲… pic.twitter.com/hzpcMOlh6j— Hardik Dohare (@mediocre_hardik) October 5, 2021
अन्य एका चाहत्याने त्याला ट्रोल करत लिहिले, निवृत्तीनंतर धोनीची कसोटी फलंदाजी आणखी सुधारली आहे.
Dhoni's Test batting improved after his retirement from Test cricket
— AKSHAY (@akshay14793) October 5, 2021
अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा पराभव
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १३६ धावा काढल्या. चेन्नईसाठी अंबाती रायुडूने अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात, दिल्लीचे फलंदाजही नियमित अंतराने बाद झाले. मात्र, शिमरॉन हेटमायरयांनी अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाला अखेरच्या षटकात महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.
चेन्नईला आपला अखेरचा सामना ७ ऑक्टोबर रोजी पंजाब किंग्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जिंकून चेन्नई अव्वल दोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने यापूर्वीच प्ले ऑफसाठी पात्रता मिळविली आहे.