आयपीएल 2023 मध्ये बुधवारी (12 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. अखेरच्या चेंडूवर या सामन्याचा निकाल लागला. शेवटच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना संदीप शर्मा याने धोनीला रोखत संघाला 3 धावांनी विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर सर्वत्र धोनीचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी सामना संपल्यानंतर धोनीने केलेल्या एका कृतीचा व्हिडिओ राजस्थानचा युवा फलंदाज ध्रुव जुरेलने शेअर केला.
सीएसकेला या सामन्यात विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य मिळाले होते. एमएस धोनी (MS Dhoni) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी सीएसकेच्या चाहत्यांना शेवटच्या चेंडूवर्यंत विजयाच्या आशा दाखवल्या. अखेरच्या तीन षटकात 54 धावांची गरज असताना दोघांनी तुफान फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात धोनीने दोन षटकार ठोकत सामना चेन्नईकडे झुकवला होता. मात्र, राजस्थानचा गोलंदाज संदीप शर्माने अखेरचे तीन चेंडू यॉर्कर टाकत चेन्नईला विजयापासून वंचित ठेवले.
या सामन्यानंतर धोनी राजस्थानच्या युवा खेळाडूंशी संवाद साधताना दिसला. यशस्वी जयस्वाल त्याच्याशी बराच वेळ बोलत असलेला दिसून आला. त्यानंतर धोनीने राजस्थानचा नवा उदयोन्मुख फलंदाज व फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या ध्रुव जुरेल याला बॅटिंग टिप्स दिल्या. ध्रुवने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले,
"Living the Dream: A surreal moment sharing the field with my idol @msdhoni bhaiya undoubtedly one of the best moments of my life!" pic.twitter.com/8dE8saS5Xh
— Dhruv Jurel (@dhruvjurel21) April 13, 2023
’मी स्वप्न जगत आहे. मला एमएस धोनी भैयासोबत मैदानावर राहता आले. निश्चितपणे ही माझ्या आयुष्यातील एक लक्षात राहणारी घटना आहे.’
जुरेल याने आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ तीनच सामने खेळले असून आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे तो देखील धोनीप्रमाणे यष्टीरक्षक-फलंदाज आहे.
(MS Dhoni Give Tips To Rajasthan Royals Dhruv Jurel After CSKvRR Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचे अभिनंदन! यॉर्कर टाकून राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या संदीप शर्माची पोस्ट व्हायरल
‘धोनी होता म्हणून…,’ सीएसकेला हरवल्यानंतर संदीप शर्माची सीएसके कर्णधाराविषयी काय म्हणाला