---Advertisement---

आयपीएल निवृत्तीच्या प्रश्नावर थाला स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी अजूनही सीएसके सोडलेली…’

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 1:00 PM
MS-Dhoni
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. सीएसकेच्या या यशाने त्यांचे चाहते खूप आनंदात होते. पण त्यांना भीती वाटत होती की कर्णधार महेंद्रसिंग धोनी सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करतो की काय. मात्र, तसे झाले नाही आणि धोनीने चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. सामन्यानंतर बोलतांना पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याच्या प्रश्नावर तो म्हणाला की, त्याने अजूनही खेळणे थांबवलेले नाही.

सामन्यानंतर बक्षीस समारंभादरम्यान बोलताना पुढच्या वर्षी आयपीएल खेळण्याबाबत जेव्हा धोनीला समालोचक हर्षा भोगले यांनी विचारले, तेव्हा धोनीने सर्वप्रथम हा निर्णय बीसीसीआय आणि चेन्नई सुपर किंग्जवर असल्याचे म्हटले. पण जाताना तो हळूच म्हणाला – ‘मी अजूनही सीएसके सोडलेली नाही.’ गेल्या वर्षीही धोनीने याच शैलीत निवृत्तीच्या प्रश्नावर उत्तर दिले होते. तेव्हा तो म्हणाला होता, ‘डेफिनेटली नॉट.’

याशिवाय, धोनीने सांगितले की, गेल्या वर्षी प्लेऑफमधील स्थान गमावल्यानंतर त्यांच्यासाठी चांगले पुनरागमन करणे महत्त्वाचे होते आणि त्याचा संघ यात यशस्वी झाला आणि जेतेपद पटकावल्याचा त्याला आनंदही आहे. धोनी म्हणाला, ‘चेन्नईबद्दल बोलण्याआधी मला केकेआरबद्दल बोलायला आवडेल. या आयपीएलमध्ये जर कोणताही संघ विजेतेपदाचा दावेदार असेल तर तो केकेआर होता. त्यांनी शानदार पुनरागमन केले. मला वाटते की ब्रेकमुळे त्यांना याचा फायदा झाला असावा.’

धोनी पुढे म्हणाला, ‘चेन्नईबाबत सांगायचे झाले तर, आम्ही आकडेवारीत सातत्यपूर्ण संघ आहोत. पण आम्ही कायम अंतिम फेरीत हरत राहिलो आहोत. आम्हाला आमच्यावर विरोधकांना वरचढ होऊ न देण्याच्या पैलूवर सुधारणा करायची होती. आता आम्ही ते साध्य केले आहे. आमच्यासाठी चांगले पुनरागमन करणे महत्त्वाचे होते आणि यात आम्ही यशस्वी झालो. याचा आम्हाला खूप आनंद आहे.’

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेने चषक उंचावताच साक्षी आणि झिवाची धोनीला कडकडून मिठी, चाहत्यांचेही मन आले भरुन

आता धोनीच म्हणतोय, “केकेआर विजयाचा हकदार होता”; दिले ‘हे’ कारण

IPL 2021: फायनलमधील मॅरेथॉन खेळीसह फाफ बनला सामनावीर, ‘हे’ आहेत याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---