भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी व युवा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यातील नाते नेहमीच गुरु शिष्याचे राहिले आहे. आपण धोनीकडून बरेच काही शिकलो असल्याचे रिषभ नेहमी कबूल करताना दिसतो. मात्र, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत सर्वप्रथम रिषभ पंतला दिल्याचे वृत्त समोर येत आहे. भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी आपल्या पुस्तकात याबाबत खुलासा केला.
जवळपास पाच वर्ष भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर यांनी नुकतेच आपल्या कोचिंग बियॉंड या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना आलेल्या अनुभवांचे वर्णन केले आहे. धोनीने 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी आपल्या निवृत्तीचे संकेत दिल्याचे श्रीधर यांनी म्हटले. त्यांनी लिहिले,
‘न्यूझीलंडला उपांत्य फेरीच्या राखीव दिवशी काही षटके खेळायची होती. त्यानंतर भारताचा डाव सुरू होणार होता. राखीव दिवशी सामना लवकर सुरू होणार होता. रिषभने कॉफी टेबलावर धोनीला विचारले की, भाई, संघातील काहीजण स्वतःहून लंडनला जाण्याचा विचार करत आहेत. तुम्ही येणार का? यावर धोनीने उत्तर देताना म्हटले, नाही रिषभ, मी संघासोबत माझी शेवटची बस ड्राईव्ह चुकवू इच्छित नाही. कदाचित रिषभला त्या गोष्टीचा अर्थ समजला नाही. मात्र, मला योग्य तो संकेत मिळाला. परंतु, मी ही गोष्ट कोणालाही न सांगण्याचे ठरवले.’
भारतीय संघाला त्या उपांत्य फेरीचा सामन्यात पराभूत होत विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर धोनी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.
(MS Dhoni Gives Hint Of His Retirement To Rishabh Pant R Sridhar Revealed In Coaching Beyond)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अक्षर पटेलने वाढवले रवींद्र जडेजाचे टेंशन! सामन्यानंतरचे जड्डूचे ट्वीट व्हायरल
हॉकी विश्वचषक 2023: भारत विरुद्ध स्पेन सामना कुठे पाहणार? संघ, रेकॉर्ड्स जाणून घ्या एकाच क्लिकवर