fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

उद्यापासून (15 सप्टेंबर) एशिया कप 2018ला संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ त्यांचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँग काँग विरुद्ध खेळणार आहे.

भारतीय संघातील काही खेळाडू या 13 सप्टेंबरलाच स्पर्धेसाठी दुबईला रवाना झाले आहेत. तर अन्य खेळाडू लवकरच दुबईत पोहचतील. भारतीय संघ या स्पर्धेला गतविजेता म्हणून सुरुवात करणार आहे.

या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंपैकी एमएस धोनीच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. एशिया कपच्या इतिहासात वनडे प्रकारात धोनीच्या नावावर सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा खास विक्रम आहे.

त्याची या स्पर्धेत वनडे मध्ये 95.16 ची सर्वाधिक सरासरी आहे. त्याने या सरासरीने आत्तापर्यंत 13 वनडे सामन्यात 571 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि 3 अर्धशतके केली आहेत.

त्याचबरोबर तो भारताकडून एशिया कपमध्ये वनडेमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 971 धावांसह सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे विराट कोहली(613) आणि गौतम गंभीर(573) आहे. त्यामुळे धोनीला या यादीत वरच्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.

तसेच त्याच्या सरासरीचा विक्रम कायम ठेवण्याचाही त्याच्या पुढे आव्हान असणार आहे. धोनी हा एशिया कपमध्ये मागील 7 डावात नाबाद राहिला असून त्याने 213.21 च्या स्ट्राईक रेटने 113 धावा केल्या आहेत.

याबरोबरच धोनीने खेळलेले एशिया कपमधील 13 वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व केले असून यातील 9 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यात पराभव पत्करला आहे.

धोनी या स्पर्धेआधी इंग्लंड दौऱ्यात खेळला आहे. पण त्यात त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर टीका झाली होती. त्यामुळे आता एशिया कपमधून धोनीला टीकाकारांना उत्तरे देण्याची संधी आहे.

एशिया कप वनडेमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरी असणारे क्रिकेटपटू-

95.16 – एमएस धोनी (13 सामने)

66.25 – नवज्योत सिद्धू (14 सामने)

64.20 – मार्वान अटापट्टू (13 सामने)

63.88 – शोएब मलिक (12 सामने)

61.30 – विराट कोहली (11 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

दोन वर्षानंतर पुन्हा धडाडणार स्टेनगन

म्हणून एमएस धोनीने सोडले कर्णधारपद

टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

You might also like