न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात उद्यापासून(6 फेब्रुवारी) 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमध्ये होणार आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला खास विक्रम करण्याची संधी आहे.
धोनीने या सामन्यात जर 13 धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावा पूर्ण करेल. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1500 धावांचा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ चौथा फलंदाज ठरेल तर जगातील 22 वा खेळाडू ठरेल.
भारताकडून आत्तापर्यंत रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताकडून टी20 मध्ये 1500 धावांचा टप्पा पार केला आहे.
रोहित आणि विराट हे आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
धोनीने आत्तापर्यंत 92 टी20 सामन्यात 37.17 च्या सरासरीने 1487 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताकडून टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
2237 धावा – रोहित शर्मा
2167 धावा – विराट कोहली
1605 धावा – सुरेश रैना
1487 धावा – एमएस धोनी
1232 धावा – शिखर धवन
महत्त्वाच्या बातम्या-
–मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी या महिन्यातील ही आहे सर्वात मोठी खुशखबर
–टी२० मालिकेत टीम इंडियाला विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी
–धोनीपासून वाचण्यासाठी आयसीसीने फलंदाजांना दिला हा खास सल्ला






