---Advertisement---

आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात धोनी पहिल्यांदाच इतका वाईट खेळला, लाजिरवाणा विक्रम नावावर झाला

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 12:14 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघ दमदार प्रदर्शन करत आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या २ स्थानांवर आपला दबदबा कायम राखून आहे. त्यांनी यंदा सर्वात आधी प्लेऑफमध्ये धडक मारण्याचीही कामगिरी केली आहे. परंतु चेन्नई संघाच्या या प्रदर्शनाआड त्यांचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी याची खराब कामगिरी झाकली जात आहे. या हंगामातील खराब फलंदाजी प्रदर्शनामुळे एक नकोसा विक्रम त्याच्या खात्यात जमा झाला आहे.

सहसा अंतिम षटकात फलंदाजीला येत तडखाफडखी फटकेबाजी करुन धावा काढण्यासाठी धोनीला ओळखले जाते. परंतु आयपीएलच्या १४ व्या हंगामात मात्र धोनीची बॅट शांत आहे.

त्याने आयपीएल २०२१ मध्ये १३ सामने खेळताना अवघ्या ८४ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ९७.६७ राहिला आहे. हा त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात कमी स्ट्राईक रेट आहे. यापूर्वीच्या कोणत्याही हंगामात त्याच्या बॅटमधून १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने धावा आल्या नाहीत.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मंगळवारी (०४ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात तर, त्याने फक्त ६६.६७ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. हा त्याच्या १३ हंगामाच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात कमी स्ट्राईक रेट आहे. तो दिल्लीविरुद्ध २७ चेंडूंमध्ये १८ धावा करू शकला. या खेळीदरम्यान तो ४६ मिनिटे मैदानावर होता. परंतु त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही. आवेश खानने यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून त्याला झेलबाद केले.

आयपीएल इतिहासात धोनीचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट २०१३ हंगामात राहिला आहे. त्याने या हंगामात १८ सामन्यांमध्ये १६२.८९ च्या स्ट्राईक रेटने ४६१ धावा फटकावल्या होत्या. यादरम्यान नाबाद ६७ ही त्याची सर्वोत्कृष्ट वैयक्तिक खेळी राहिली होती. त्यानंतर २०११ मध्येही त्याने प्रशंसनीय अशा १५८.७० स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीत कोणत्या हंगामातील दुसरा सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट राहिला आहे.

धोनीच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा स्ट्राईक रेट १३५.७९ इतका राहिला आहे. त्याने २१७ आयपीएल सामने खेळताना ४७१६ धावा चोपल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---