दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सोमवारी (४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या षटकात ३ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघात मोठा बदल करण्यात आला होता. या सामन्यात सुरेश रैनाऐवजी रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली होती. मात्र तो या संधीचा लाभ घेऊ शकला नाही आणि स्वस्तात माघारी परतला. दरम्यान त्याचा झेल टिपताना रिषभ पंतने असे काही कृत्य केले होते, जे पाहून आर अश्विन देखील अस्वस्थ झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्स संघासाठी पदार्पण करण्यासाठी खूप वाट पाहावी लागली आहे. परंतु पहिल्याच सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही. त्याने या डावात १९ चेंडुंमध्ये १९ धावांची खेळी केली. त्यानंतर तो आर अश्विनच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला होता.
तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाची गोलंदाजी सुरू असताना ९ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रॉबिन उथप्पाने मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटचा कडा घेत वरच्या दिशेने गेला. हे पाहून रिषभ पंतने देखील आर अश्विनच्या दिशेने धाव घेतली. रिषभ पंत आपल्या दिशेने धावत येत आहे, हे पाहून आर अश्विन अस्वस्थ झाला होता. परंतु शेवटी त्याने झेल टिपला आणि रॉबिन उथप्पा १९ धावांवर माघारी परतला.
येथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/244058/m50-dc-vs-csk-robin-uthappa-wicket
उथप्पाप्रमाणे बर्थ डे बॉय रिषभ पंतला देखील वाढदिवसाच्या दिवशी मोठी खेळी करता आली नाही. तो १२ चेंडूंमध्ये १५ धावा करत माघारी परतला. या दरम्यान त्याने २ वेळेस जीवनदान देखील मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
किती गोड! वडीलांचा संघ जिंकावा म्हणून लेक झिवाची देवाकडे प्रार्थना, क्यूट क्षणाकडे नेटकरी आकर्षित
निर्णायक षटकात असं काही घडलं की, प्रशिक्षक पाँटिगचा संताप अनावर, पंचांना विचारला जाब; घ्या जाणून
माही भाई, घड्याळ कडक दिसतंय, देतोस का? नाणेफेकीवेळी बड्डे बॉय पंतची धोनीसोबत मस्करी- VIDEO






