---Advertisement---

किती गोड! वडीलांचा संघ जिंकावा म्हणून लेक झिवाची देवाकडे प्रार्थना, क्यूट क्षणाकडे नेटकरी आकर्षित

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 9:43 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील ५० वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. जेव्हा टेबल टॉपर संघ आमने सामने असतात तेव्हा चाहत्यांना अटीतटीची लढत पाहायला मिळत असते. असेच काहीसे या सामन्यात देखील पाहायला मिळाले. शेवटच्या षटकात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान सामना सुरू असताना एमएस धोनीची चिमुकली मुलगी झिवा धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसून आली होती. हे पाहून साक्षी धोनीने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय.

एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि त्यांची मुलगी झिवा धोनी हे चेन्नईचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावत असतात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना पाहण्यासाठी देखील त्या मैदानात उपस्थित होत्या. अशातच दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत सुरू असताना झिवा चेन्नई संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करताना दिसून आली होती.

तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूंमध्ये २८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण होते. त्यावेळी कॅमेरामॅनने झिवा धोनीकडे कॅमेरा वळवला. त्यावेळी ती चेन्नईचा विजय व्हावा म्हणून प्रार्थना करत होती. हे पाहून साक्षी धोनी आश्चर्यचकित झाली होती. आपल्या मुलीला असे करताना पाहून तिला आनंद देखील झाला होता. तसेच झिवाचा हा क्यूट अंदाज चाहत्यांनाही आवडला आहे.

https://twitter.com/SattuSupari_/status/1445077242741235717?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1445077242741235717%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fipl-2021-ms-dhonis-daughter-ziva-was-seen-praying-for-the-victory-of-fathers-team-csk-mother-sakshi-reacted-like-this-dc-vs-csk-hindi-2563861

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई सुपर किंग्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अंबाती रायुडूने नाबाद ५५ धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने १९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने नाबाद ३९ धावांची खेळी केली तर, शिमरोन हेटमायरने नाबाद २८ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

निर्णायक षटकात असं काही घडलं की, प्रशिक्षक पाँटिगचा संताप अनावर, पंचांना विचारला जाब; घ्या जाणून

माही भाई, घड्याळ कडक दिसतंय, देतोस का? नाणेफेकीवेळी बड्डे बॉय पंतची धोनीसोबत मस्करी- VIDEO

Video: सामना जिंकताच हेटमायरची प्रतिस्पर्धी ब्रावोच्या पाठीवर झेप; दिल्ली-चेन्नईच्या खेळाडूंनी जिंकली मनं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---