दिल्ली कॅपिटल्स संघाचा युवा कर्णधार रिषभ पंत आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचा अनुभवी कर्णधार एमएस धोनी हे सोमवारी (४ ऑक्टोबर) आमने सामने होते. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यातील नाणेफेक सुरू असताना रिषभ पंतने असे काही मजेशीर कृत्य केले होते, ज्यामुळे चाहत्यांनी त्याची मजा घ्यायला सुरुवात केली आहे.
नाणेफेक झाल्यानंतर एमएस धोनी आणि रिषभ पंत यांच्यात गुरू-शिष्यातील नाते देखील पाहायला मिळाले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर समालोचन करत असलेल्या इयान बिशप यांनी जेव्हा त्याला विचारले की, मार्गदर्शक एमएस धोनी विरुद्ध खेळताना तुला कसे वाटत आहे? याचे उत्तर देत रिषभ पंत म्हणाला की, “मी माही भाईकडून खूप काही शिकलो आहे, अजूनही शिकतोय. परंतु आता ते माझे ‘प्रतिस्पर्धी’ आहेत. त्यामुळे मी बरोबरीची लढाई करेल.”
तसेच नाणेफेक झाल्यानंतर एमएस धोनी आणि रिषभ पंत मस्ती करताना दिसून आले होते. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये तो एमएस धोनीच्या घडीकडे पाहताना दिसून येत आहे. याच दिवशी रिषभ पंतचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे चाहत्यांनी वेगवेगळे मजेशीर अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
हा व्हिडीओ पाहून एका युजरने ट्विट केले की, “माही भाई तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची ही घडी देऊन टाका.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “रिषभ पंत आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धोनीकडून घडी भेट मागत असताना….” तर हा व्हिडीओ पाहून आणखी एका युजरने लिहिले की, “या जोडीचे आमच्या हृदयात वेगळेच स्थान आहे.”
Pure bliss ????@msdhoni @RishabhPant17 #CSKvsDC ???????? pic.twitter.com/dHpe6FIY3F
— M F C (@urstruly_SD) October 4, 2021
Fanboy birthday funny moment : ????
Mahi bhai, give me your watch for my birthday gift. #HappyBirthdayRishabhPant @msdhoni @RishabhPant17 pic.twitter.com/pVe2u4kPTM
— hmm… (@ForeverVashi) October 4, 2021
This duo has a separate place in our hearts!❤️???? @msdhoni @RishabhPant17 #Dhoni pic.twitter.com/Es8wuKxtqb
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) October 4, 2021
"Always great learning from MS, but right now he's a rival for me, so focus is on the game."
– Rishabh Pant ????????#HappyBirthdayRishabhPant #DCvsCSK https://t.co/9NET5WJf8v
— Ryan (@ryandesa_07) October 4, 2021
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या षटकात हा सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
हिटॅमनकडून पत्नीची थट्टा! गोड गिफ्ट हातात असतानाही रितिकाचा मुठ उघडण्यास नकार, पाहा व्हिडिओ
आयपीएलमध्ये पुन्हा तळपली ‘गब्बर’ची बॅट! ५ व्यांदा ‘असा’ कारनामा करत धवनची विराटशी बरोबरी






