---Advertisement---

हिटॅमनकडून पत्नीची थट्टा! गोड गिफ्ट हातात असतानाही रितिकाचा मुठ उघडण्यास नकार, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 7:35 AM
---Advertisement---

या मोसमात मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चांगली राहिली नाही आणि प्लेऑफ गाठणेही आता कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा नक्कीच निराश झाला आहे. पण या सगळ्यादरम्यान त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूप व्हायरल होत आहे.

रोहितने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात तो आपली पत्नी रितिका सजदेहची थट्टा करताना दिसला होता. व्हिडिओमध्ये, रोहित त्याच्या मुठीत चॉकलेट धरतो आणि पत्नीच्या दिशेने जातो आणि तिला तो त्याची मुठ उघडण्यास सांगतो, ज्यावर रितिका घाबरते आणि मुठ उघडण्याचे धाडस करत नाही.

रितिकाला भीती वाटत असते की रोहितच्या मुठीत भलतेच काहीतरी असावे, असा विचार करते, पण त्याचसोबत तिची इच्छा असूनही ती त्याची मुठ उघडत नाही. रोहितच्या वारंवार विनंतीनंतरही रितिका मुठ उघडण्यास तयार नव्हती, पण त्यानंतर रोहितची पत्नी त्याच्या मुठीत काय आहे ते पाहण्याचे धाडस करते. शेवटी, जेव्हा रोहित आपली मुठ उघडतो, तेव्हा त्यात भितीदायक असे काहीही नसते तर त्यातून चॉकलेट बाहेर येते, जे पाहून रितिकाला आश्चर्याचा सुखद धक्का बसतो आणि तिला हायसे वाटते.

https://www.instagram.com/reel/CUmepdnDy0Y/?utm_medium=copy_link

 

मुंबई इंडियन्स संघाचा प्रवास या आयपीएलमध्ये चांगला राहिलेला नाही आणि ते गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफ गाठणे आता जवळजवळ अशक्य झाले आहे. उर्वरित सामना जिंकण्याव्यतिरिक्त मुंबई संघाला नेटरनरेटही वाढवावा लागेल. मुंबई आता आपला पुढचा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादसोबत खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघ याआधीच प्लेऑफमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये आणखी एक कोणता संघ स्थान मिळवणारे हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘विकेट घेण्यापेक्षा तू हे कर’, विराटने चहल दिला होता ‘हा’ गुरुमंत्र

‘बायो बबलमध्ये वेळ घालवत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांना व्याख्यान देऊ नका’, माजी इंग्लिश कर्णधाराने पेनला फटकारले

‘मला कधीच जाणवले नाही, की केएल राहुल एक चांगला लीडर आहे’, जडेजाने केले मोठे व्यक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---