---Advertisement---

Video : ‘२०२३मध्ये परत येतोय, तोवर हा षटकार लक्षात ठेवा’, शेवटच्या सामन्यात धोनीने मारला अफलातून सिक्स

On: शनिवार, मे 21, 2022 1:36 PM
MS-Dhoni
---Advertisement---

मुंबई। राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात शुक्रवारी (२१ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६८ वा सामना पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ५ विकेट्सने विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ससाठी हा आयपीएल २०२२ मधील हा अखेरचा सामना ठरला. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला. 

या सामन्यात धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण चेन्नईकडून केवळ मोईन अलीने (Moeen Ali) शानदार कामगिरी केली. त्याने ९३ धावांची खेळी केली. मात्र, अन्य फलंजादाजांनी निराश केले. धोनीनेही धीम्या गतीने २८ चेंडूत २६ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि १ षटकार मारला. पण, तरीही त्याने या खेळीदरम्यान मारलेला एकमेव षटकार चर्चेचा विषय ठरला, कारण त्याने या षटकाराने जुन्या आठवणी ताज्या केल्या.

चेन्नई सुपर किंग्स संघ फलंदाजी करत असताना डावाच्या १८ व्या षटकात राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीला आला. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने मिडविकेटवरून लांबलचक षटकार (Monstrous Six) मारला. त्याच्या या ९८ मीटरच्या षटकाराने पूर्वीच्या धोनीची (Vintage Dhoni) चाहत्यांना आठवण झाली. धोनी अशाच स्टाईलमध्ये अनेकदा पूर्वी षटकार ठोकायचा.

पण, असे असले तरी धोनी या सामन्यातील (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) त्याच्या धीम्या खेळीमुळे टीकेचाही धनी ठरला होता. कारण चेन्नईला या सामन्यात मोईन अलीच्या ९३ धावांनंतरही २० षटकात केवळ १५० धावाच करता आल्या. त्यामुळे १५१ धावांचे आव्हान राजस्थानने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत सहज गाठले.

व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

चेन्नईची निराशाजनक कामगिरी
चेन्नई सुपर किंग्सने या हंगामात निराशाजनक कामगिरी केली, त्यांना १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकण्यात यश आले, तसेच १० सामने त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांचे यावर्षी प्लेऑफला पोहचण्यासाठीचे आव्हान संपुष्टात आले आले.

पुढीलवर्षी खेळण्याचे धोनीचे संकेत
दरम्यान, धोनीने हा सामना खेळण्याआधी संकेत दिले की, तो पुढीलवर्षी देखील चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळताना दिसू शकतो. धोनीने या सामन्याच्या नाणेफेकीवेळी सांगितले की, ‘जर मी चेन्नईत न खेळताच आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर हा चेन्नई आणि चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीवर एकप्रकारे अन्यायच असेल.’ धोनीने अशी प्रतिक्रिया देत एकप्रकारे तो चेन्नईत खेळून निवृत्ती घेईल, असे संकेत दिले आहेत. तथापि, धोनीने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

सीझनचा शेवटचा सामनाही कसा काय गमावला? शेवटी धोनीने मनातलं उत्तर दिलं, पाहा काय म्हणाला

खराब प्रदर्शनामुळे प्लेऑफमधून OUT झालेल्या मुंबईच्या कर्णधाराचा फॅन्ससाठी भावूक Video, तुम्हाला सलाम आहे!

बिच्चारा बॅट्समन, कधी वाटलं पण नसेल असा आऊट होईल म्हणून, Video पाहा ओरडत गेलाय तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---