---Advertisement---

नव्या गाडीवर धोनीने खर्च केले 3.3 कोटी! आवाज आणि नंबर प्लेटचं प्रत्येकाकडून कौतुक

MS Dhoni in his new Mercedes Benz G Class
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू एमएस धोनी नेहमीच चर्चेत असतो. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात देखील धोनी खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एकदा आयपीएल चॅम्पियन बनवण्यासाठी धोनी मैदानात उतरणार असून चाहते त्याला पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात भारतीय संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) धोनी सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. माजी भारतीय कर्णधाराचे दोन आणि चार चाकी गाड्यांवर असणारे प्रेम कधी लपून राहिले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर हे प्रेम अधिकच वाढल्याचे दिसते. नुकताच त्याचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये धोनी मर्सिडिज बेंझ जी क्लास (Mercedes Benz G Class) गाडी स्वतः चालवत आहे.

धोनीला मर्सिडीज बेंझ जी क्लास चालवताना पाहून चाहते भलतेच उत्साही झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओतील गाडीच्या नंबर प्लेटची देखील चर्चा होत आहे. गाडी झारखंड पासिंगची असून 0007 नंबर दिसत आहे. दरम्यान, धोनीचा जर्सी नंबर देखील 7 असल्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. माध्यमांमध्ये अशाही बातम्या आल्या आहेत की, धोनीने ही जी क्लास काही महिन्यांपूर्वी खरेदी केले आहे. या गाडीची किंमत भारतात 3.3 कोटी इतकी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumeet Kumar Bajaj (@bajaj.sumeetkumar) 

माध्यमांतील वृत्तांनुसार धोनी सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. आयपीएळ 2023 मध्ये धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि तो या दुखापतीसह खेळत होता. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने मागच्या वर्षी आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. धोनी पाचव्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेईल, असा अनेकांचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. आगामी हंगामात खेळण्यासाठी दिग्गज तयारी करत आहेत. चाहते देखील त्याला पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. येत्या 19 डिसेंबर रोजी बीसीसीआयने आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला गेला आहे. (MS Dhoni in his new Mercedes Benz G Class)

महत्वाच्या बातम्या – 
IND vs AUS । ज्याच्यामुळे शतक वाया गेले, त्यालाच पाठीशी घातले! पाहा पराभवानंतर ऋतुराज काय म्हणाला
Team India । द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवले, पण जय शहा काय म्हणाले पाहाच…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---