भारतीय संघाचा यष्टीरक्षक एमएस धोनीने शुक्रवारी(18 जानेवारी) झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबर भारताने तीन सामन्यांची ही वन-डे मालिका 2-1 अशी सहज जिंकली.
धोनीने या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत उत्तम कामगिरी केल्याने त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
यावेळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनीही धोनीला सुपरस्टार म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
“धोनी हा सुपरस्टार असून तो दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे”, असे लॅंगर यांनी म्हटले आहे.
“37 वर्ष वय असलेल्या धोनीने एकेरी-दुहेरी धावा घेण्यामध्ये भर देत सगळ्यांना आश्चर्यचकीत करून सोडले आहे. या वयातही त्याचा फिटनेस अप्रतिम आहे”, असेही लॅंगर पुढे म्हणाले आहेत.
या तिसऱ्या वनडे सामन्यात धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यामुळे भारताने हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियामध्ये प्रथमच द्विपक्षीय वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचला.
या मालिकेत धोनीने सलग तीन अर्धशतके केली असून त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. या मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक 193 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–सातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत
–न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया
–एमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स?