---Advertisement---

एमएस धोनी इज बॅक!

On: मंगळवार, जानेवारी 15, 2019 5:03 PM
---Advertisement---

ऍडलेड। भारताने आज(15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.

भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी तर एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.

धोनीने  त्याचे अर्धशतक 53 चेंडूत षटकार खेचत पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील 69 वे अर्धशतक ठरले आहे. त्याने या सामन्यात 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 2 षटकार मारले आहेत.

तसेच त्याने या  सामन्यात 104 धावांची शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीबरोबर धोनीने चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली आहे. तर त्याने पाचव्या विकेटसाठी दिनेश कार्तिकबरोबर नाबाद 57 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

९ भारतीय कर्णधारांना जे जमले नाही किंग कोहलीने कांगारूच्या भूमीत करून दाखवले

कर्णधार कोहलीचे दुसऱ्या वनडेत शानदार शतक!

विराट एक्सप्रेस सुसाट, संगकाराचा विक्रमही मोडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment