नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीला जगातील सर्वात शांत कर्णधारांपैकी एक समजले जाते. परिस्थिती कशीही असो, धोनी आपले संतुलन बिघडू देत नाही आणि खेळाडूंवर विश्वास ठेवतो. कदाचित यामुळेच त्याला ‘कॅप्टन कूल’ असे म्हटले जाते. धोनीच्या नेतृत्वाची नेहमीच इतर कर्णधारांशी तुलना होत आली आहे. धोनीच्या नेतृत्वाची तुलना गौतम गंभीरबरोबरही झाली आहे. तसेच, एका व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे माजी संचालक जॉय भट्टाचार्य यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
‘खेळाडूंसाठी गोळी खाऊ शकतो गंभीर’
‘ओकट्री स्पोर्ट्स’ या यूट्यूब चॅनेलशी चर्चा करताना जॉय यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,
“गंभीर शांत कर्णधार नाही. गंभीरमध्ये एक वेगळीच धमक आहे. तो आपल्या खेळाडूंसाठी गोळीदेखील खाऊ शकतो. जेव्हा तुम्ही गंभीरबरोबर उभे राहाल, तेव्हा तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. असेच काही चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंंडियन्सबाबतही आहे. यशस्वी संघ नेहमीच आपल्या कर्णधाराच्या उत्कृष्ट चारित्र्याने पुढे वाटचाल करत असतात.”
जॉय यांनी एका घटनेचा उल्लेख करत सांगितले, की लक्ष्मीपति बालाजीने (Laxmipathy Balaji) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आयपीएल २०११ च्या मोसमातील एका सामन्यात शेवटच्या षटकात २१ धावा दिल्या होत्या. परंतु कर्णधार गंभीर त्याचा उत्साह वाढवत राहिला. त्याचबरोबर तो संघाच्या बसमध्येही एकत्र बसले होते.
गंभीरची कामगिरी
गंभीरला भारताचा एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्याने २००७ चा टी२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषक भारताला जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तसेच तो एक चांगला कर्णधार असल्याचेही आयपीएलमधून दिसून आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. याबरोबरच गंभीरने ६ वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून या सर्व सामन्यात भारतीय संघ विजयी ठरला आहे.
गंभीरने (Gautam Gambhir) २००७च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ५४ चेंडूत ७५ धावा ठोकल्या होत्या आणि भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर २०११च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने सर्वाधिक ९७ धावा करत संघाला दुसऱ्यांदा विश्वविजेते बनवण्यात मोलाचा कामगिरी बजावली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट सोडताच रस्त्यावर आला ‘हा’ क्रिकेटपटू; कुटुंब चालविण्यासाठी लावली जीवाची बाजी
-भारत म्हणजे मॅच फिक्सिंगचा अड्डा, पहा कुणी केली ही विषारी टीका
-ड्युमिनी म्हणतो, त्या भारतीय फलंदाजांच्या पुल शाॅटचा दिवाना