चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी बुधवारी (12 एप्रिल) राजस्थान रॉयल्सविरुद्ध महत्वाच्या धावा करू शकला. पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. सामना गमावल्यानंतर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग यांनी धोनीला गुडघ्याची दुखापत झाली आहे, अशी माहिती दिली. तत्पूर्वी सीएसकेच्या एकापाठोपाठ एका खेळाडूला दुखापती होत आल्या आहेत. अशात दोनीच्या दुखापतीची बाब चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे.
दक्षिण आफ्रिकाचे वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला हादेखील दुखापतीच्या कारणास्तव पुढे दोन आठवडे सीएसकेकडून खेळू शकणार नाहीये. बुधवारी राजस्थान रॉयल्सकडून 3 धावांनी पराभव स्वीकारल्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी फ्लेमिंगने धोनीच्या दुखापतीची माहिती दिली. फ्लेमिंग म्हणाले, “तो (धोनी) गुडघ्याच्या दखापतीशी झगडत आहे. तुम्ही त्याची हालचाल पाहिली असेल, त्याला त्रास होत होती. त्याची फिटनेस नक्कीच एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे आहे. आयपीएल सुरू होण्याआधीच काही महिने तो सरावाला सुरुवात करतो. त्याने रांचीमध्ये नेट्समध्ये सराव केलेला. हंगामा सुरू होण्याआधी त्याने चेन्नईत आपला सराव सुरू केला होता.”
धोनीला दुखापत झाली असली तरी फ्लेमिंगला धोनीवर विश्वास आहे की तो लवकरच यादून सावरेल आणि संघाचे नेतृत्व करत राहील. “तो फॉर्ममध्ये परतण्यासाठी आपल्या पद्धतीने काम करतो आणि तुम्ही पाहू शकता की, तो खूप चांगला खेळत आहे.” सीएसकेचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला बुधवारच्या सामन्यात दोनच षटके गोलंदाजी करू शकला. त्यानंतर दुखापतीच्या कारणास्तव त्याने मैदान सोडले. याविषयी फ्लेमिंग म्हणाले, “संघाला पुन्हा एकदा एका खेलाडूची सेवा मिळणार नाही. आम्ही आधीच खेळाडूच्या दुखापतींमुळे त्रस्त आहोत. त्यामुळे ही संघा अजून वाढू नये अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान, चालू आयपीएल हंगामात सीएशकेचा अष्टपैलू बेन स्टोक्स यालाही दुखापतीच्या कारणास्तव मागच्या दोन सामन्यात खेळता आले नाहीये. प्रशिक्षकांच्या माहितीनुसार स्टोक्स दुखापतीतून सावरण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामात देखील बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. (MS Dhoni is struggling with a knee injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोट्यावधी धोनी प्रेमी जमले एकत्र! सीएसके-राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर घमासान
‘मृत्यू यायचा तिथेच येतो’, भारतीय संघाबाबत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान






