---Advertisement---

जेव्हा एमएस धोनी वॉटसन, ताहीरच्या मुलांबरोबर लावतो शर्यत…, पहा व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 7, 2019 2:57 PM
---Advertisement---

चेन्नई। शनिवारी(6 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सने एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबचा 22 धावांनी पराभव केला. हा चेन्नई सुपर किंग्सचा या मोसमातील चौथा विजय ठरला आहे.

या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी मजा-मस्ती करताना दिसून आला आहे. चेन्नईच्या संघातील खेळाडू सामन्यानंतर मैदानावर गप्पागोष्टी करत होते. यावेळी शेन वॉटसन आणि इम्रान ताहीर हे दोघे त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवत होते. या दोघांच्या मुलांनी धावण्याची शर्यत लावली होती. या दरम्यान धोनीही त्यांच्यात सामील झाला. 

याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की ताहीर आणि वॉटसन हे त्यांच्या मुलांनी नुकतीच पूर्ण केलेली एक शर्यत पाहत आहेत. त्यानंतर दोघेही मुले पुन्हा शर्यतीसाठी तयार झाले, त्यावेळी धोनी मागून पळत आला आणि उलट्या दिशेने पळू लागला.

पुढे गेल्यावर त्याने ताहीरच्या मुलाला उचलून घेतले आणि तो परत पळत आला. त्यांच्यामागून आलेल्या वॉटसनच्या मुलाने पुन्हा ही शर्यत लावू असे म्हटले पण धोनीने लगेचच हसून नाही असे म्हटले आणि तिथून तो निघून गेला.

या सामन्यात धोनीने चेन्नईकडून महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याने 23 चेंडूत 37 धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिसने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वॉटसनने 26 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 160 धावा केल्या.

चेन्नईने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून केएल राहुल आणि सर्फराज अहमदने अनुक्रमे 55 आणि 67 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यांना पंजाबला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबला 20 षटकात 5 बाद 138 धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूने केलेला तो विक्रम अखेर ११ वर्षांनी मोडीत…

‘कॅप्टन कुल’ अनुप कुमार पुणेरी पलटनचा मुख्य प्रशिक्षक…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment