हैद्राबाद। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शनिवारी(2 मार्च) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 5 सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताकडून केदार जाधवने 87 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. या खेळीत केदारने 9 चौकार आणि 1 षटकार मारले. तर एमएस धोनीने 72 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 59 धावा केल्या. त्याचबरोबर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 141 धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.
याबरोबरच केदार आणि धोनीच्या जोडीने एक खास विक्रम केला आहे. केदार आणि धोनीमध्ये झालेली 141 धावांची भागीदारी ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये पाचव्या विकेटसाठी भारतीय जोडीने केलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. त्याचबरोबर त्यांनी अजय जडेजा आणि रॉबीन सिंग यांच्या जोडीची बरोबरी केली आहे.
याआधी 4 जून 1999 ला झालेल्या सामन्यात अजय जडेजा आणि रॉबीन सिंग यांच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचव्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी केली होती.
तसेच भारताकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेमध्ये पाचव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर धोनी आणि रोहित शर्मा यांची जोडी आहे. त्यांनी 2 नोव्हेंबर 2013 ला 167 धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडेमध्ये पाचव्या विकेटसाठी केलेली जगातील सर्वोच्च भागीदारी आहे.
वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाचव्या विकेटसाठी सर्वोच्च भागादारी-
167 – एमएस धोनी, रोहित शर्मा
162 – इंझमाम उल हक, मोहम्मद युसुफ
148 – ख्रिस केर्न्स,रॉजर टॉस
142 – रॉबिन स्मिथ, ग्रॅहम थॉर्पे
141* – एमएस धोनी, केदार जाधव
141- अजय जडेजा, रॉबिन सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल फॅन्स!!! मुंबई इंडियन्सची नवी जर्सी पाहिली का?
–टॉप १०: पहिल्या वनडेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी केले हे खास विक्रम
–९९ धावांवर ४ विकेट असतानाही कोहली शास्त्रींना का म्हणाला ‘ही चांगली गोष्ट आहे’, वाचा