---Advertisement---

जडेजाने विजयी चौकार मारताच धोनीला झाला सर्वात जास्त आनंद, उचलून घेतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

On: मंगळवार, मे 30, 2023 7:49 AM
Ravindra Jadeja lifting Ravindra Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023चा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज ठरला. सीएसकेने या सामन्यात 5 विकेट्स राखून विजय मिळवला. विजयात अष्टपैलू रविंद्र जडेजा याचे योगदान महत्वपूर्ण ठरले. जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि चौकार मारून सीएसकेला विजय मिळवून दिला. पाचव्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी देखील खूपच खुश होता. धोनीने आनंदाच्या भरात धावत आलेल्या जडेजाला उचलून घेतले, जो या सामन्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणता येईल.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज 2008 पासून खेळत आहे. दरम्यानच्या काळात दोन वर्ष संघ आयपीएल खेळला नाही आणि आतापर्यंत एकूण 5 आयपीएल ट्रॉफी संघाने जिंकल्या आहेत. सोमवारी (29 मे) सीएसकेला डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकांमध्ये 171 धावांचे लक्ष्य मिळाले होते. जडेजाने अगदी शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार मारत सीसकेला विजय मिळवून दिला. सीएसके या सामन्यात कोट्यावधी चाहते धोनीकडे पाहत होते. धोनीने रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला उचलून घेतल्याचा तो क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये गुजरातने 4 बाद 214 धावा साकारल्या. गुजरातला विजय मिळवून देण्यासाठी साई सुदर्शन याने जबरदस्त खेळी केली, पण संघाला विजय मिळाला नाही. साईने अवघ्या 47 चेंडूत 96 धावांचे योगदान दिले. सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) या सामन्यातही मोठी खेळी करणार, असे दिसत होते. पण यष्टीपाठी धोनीने चवळाई दाखवत त्याला यष्टीचीत केले. गिलने 20 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त गुजरातचा सलामीवीर रिद्धिमान सहा याने 39 चेंडूत 54 धावा केल्या. हार्दिक पंड्या 21 धावा करून शेवटपर्यंत नाबाद होता.

गुजरातच्या डावानंतर अचानक पावसाला सुरूवात झाला. पावस थांबल्यानंतर ग्राउंड स्टाफच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सामना कसाबसा 12.10 मिनिटांनी सुरू झाला. धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेला 15 षटकांमध्ये 171 धावा करायच्या हत्या, ज्या त्यांनी केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (26), डेवॉन कॉनवे (47), शिवम दुबे (32*), अजिंक्य रहाणे (27) आणि रविंद्र जडेजा (15*) या सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि सीएसके जिंकली. कर्णधार धोनीकडून चाहत्यांना महत्वपूर्ण धावांची अपेक्षा होती. मात्र, तो गोल्डन डकवर गेला. मोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर धोनीने डेविड मिलरच्या हातात झेलबाद झाला.

गोलंदाजी विभागाचा विचार केला, तर गुजरात मोहित शर्मा सर्वाधिक तीन विकेट्स घेऊ शकला. यासाठी त्याने 3 षटकात 36 धावाही खर्च केल्या. नूर अहमद याने 3 षटकात 17 धावा देत सीएसकेच्या दोन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी सीएसकेसाठी मथिशा पथिराना याने 4 षटकांमध्ये 44 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी 38-38 धावा खर्च करून प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.  (MS Dhoni lifting Ravindra Jadeja in 2023 final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एकच वादा धोनी दादा, गुजरातला घरात घुसून…’, धोनीच्या CSKने ट्रॉफी जिंकताच केदार जाधव भलताच खुश  
IPL ट्रॉफी हुकली, पण पुरस्कार पटकावण्यात टायटन्स आघाडीवर; वाचा कुणी-कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---