आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. यादरम्यान सर्व आयपीएल संघ आयपीएल 2021 दरम्यान घडलेले मजेशीर प्रसंग सोशल मीडियात शेअर करत आहेत. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जडेजाची नक्कल केली आहे.
एका सराव सत्रादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणि रॉबिन उथप्पा एकत्र बसले होते. धोनीने यावेळी रवींद्र जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल केली असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. धोनी फक्त हात फिरवून जडेजाची नक्कल करत होता, तर शेजारी बसलेला रॉबिन उथप्पा त्यावर हसत होता. हा सर्व प्रसंग सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात वायरल होत असून चाहत्यांनी देखील धोनीच्या या विनोदी अंदाजला फार पसंत केले आहे.
S♾ord ⚔️ ft.Thala ????#WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/fsO7lqMYRs
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 16, 2021
रवींद्र जडेजा जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सामन्यात किंवा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावतो, तेव्हा तो बॅटला तलवारी प्रमाणे फिरवत आनंद साजरा करतो. जडेजाची ही शैली आता खूप मोठ्याप्रमाणात लोकप्रिय झाली आहे. दरम्यान आयपीएल 2021 मधील सीएसकेच्या कामगिरीचा विचार केला असता त्यांच्यासाठी हा हंगाम उत्तम राहिला. संघाने 7 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवले होते. यावेळी सीएसकेने 10 गुणांसह क्रमवारीत दुसरे स्थान देखील पटकावले होते.
तसेच रवींद्र जडेजाच्या कामगिरीचा विचार केला असता त्याच्यासाठी देखील यावर्षीचा हंगाम शानदार ठरला. जडेजाने गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत शानदार कामगिरी केली. याशिवाय मोईन अली आणि फाफ डु प्लेसिस यांनीही संघासाठी शानदार कामगिरी केली. आयपीएल 2021 दरम्यान बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यावर्षीची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना आयपीएल स्पर्धा लवकरात लवकर सुरू होण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मिळाले दोन नवे प्रशिक्षक, एक आहे माजी सलामीवीर
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे खुशखबर
आयपीएलमध्ये भावासमोर गोलंदाजी करताना सॅम करनची ‘अशी’ झाली होती अवस्था, स्वतः केला खुलासा





